अनैतिक संबंध अन् 2 वर्षे छळ, नाशिकमधील प्रसिद्ध महिला डॉक्टर मनीषा जेजुरकरांनी का संपवलं जीवन? अखेर कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी आयुष्याचा शेवट केल्याची बातमी समोर आली होती. आता या प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली होती. शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी गंगापूर रोड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत गळफास घेऊन आत्महत्या केली. एका प्रसिद्ध महिला डॉक्टरने अशाप्रकारे आयुष्य संपवल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होता. आता मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.
अनैतिक संबंध अन् २ वर्षे छळ
पतीचं विवाहबाह्य संबंध आणि केल्या जाणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा आरोप मनीषा यांच्या कुटुंबीयांनी केला असून याप्रकरणी मनीषा यांचे पती आणि सरकारी डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच डॉक्टर निलेश जेजुरकर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
नेमकी घटना काय घडली?
नाशिकमधल्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी महिला डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केली होती. एका महिला डॉक्टरने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने सर्वत्र नाशिक शहरात एकच खळबळ उडाली होती. आता या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.
मनीषा यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मनीषा यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून जेजुरकर दाम्पत्यात वाद सुरू होते. निलेश यांचे एका परस्त्रीसोबत विवाहबाह्यसंबंध होते. तसेच ते कौटुंबीक कारणातून सातत्याने छळ करत होते. याच वादातूनच डॉक्टर मनीषा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी निलेश जेजुरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
संशयित आरोपी डॉक्टर फरार
गंगापूर पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार झाले आहेत. सध्या गंगापूर पोलीस तसेच क्राइम ब्रांच कडून त्यांचा शोध सुरू आहे. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. मनीषा यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या इतर लोकांवर देखील कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मनीषा यांच्या भावांकडून केली जात आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अनैतिक संबंध अन् 2 वर्षे छळ, नाशिकमधील प्रसिद्ध महिला डॉक्टर मनीषा जेजुरकरांनी का संपवलं जीवन? अखेर कारण समोर









