Iran Strike US :अमेरिकेचा THAAD ठरला फुसका बार! इराणच्या हल्ल्यात १६ हजार कोटींचा चक्काचूर, महासत्तेची कशी झाली नाचक्की!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran Attack US : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या अमेरिकन डिफेन्स सिस्टमचा जगभरात गाजावाजा होता, ती इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसमोर हतबल ठरली आहे.
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या अमेरिकन डिफेन्स सिस्टमचा जगभरात गाजावाजा होता, ती इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसमोर हतबल ठरली आहे. युद्धाच्या पहिल्या चार दिवसांतच अमेरिकेचे तब्बल २ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १६,००० कोटी रुपये) लष्करी नुकसान झाले असून, यामध्ये अत्याधुनिक रडार आणि लढाऊ विमानांचा समावेश आहे.
अमेरिकेचे 'अर्ली वॉर्निंग रडार' मातीमोल
इराणी ड्रोन्सनी कतारमधील 'अल उदीद' एअर बेसवर तैनात असलेल्या अमेरिकेच्या AN/FPS-132 अर्ली वॉर्निंग रडार यंत्रणेला लक्ष्य केले. सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची ही यंत्रणा इराणने उद्ध्वस्त केली असून कतारने याला दुजोरा दिला आहे. याशिवाय बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या (Fifth Fleet) मुख्यालयावरही हल्ला करून इराणने सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्स आणि महत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.
advertisement
THAAD ची का निघाली हवा?
जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी 'थाड' (THAAD) अँटी-बॅलिस्टिक मिसाइल यंत्रणा इराणच्या हल्ल्यासमोर अपयशी ठरली आहे. जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी एअर बेस आणि यूएई मधील अल-रुवाइस येथील थाड रडार यंत्रणांना इराणच्या अचूक क्षेपणास्त्रांनी टार्गेट केले. ३०० दशलक्ष डॉलर्सचे रडार निकामी झाल्याने अमेरिकेच्या डिफेन्स स्ट्रॅटेजीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement
S-400 विरूद्ध THAAD: भारत का ठरला सरस?
माजी एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी 'युरेशियन टाइम्स'मध्ये लिहिलेल्या लेखात भारतीय हवाई दलाच्या कौशल्याचा उल्लेख केला आहे. २०२५ च्या संघर्षात पाकिस्तानने चिनी उपग्रहांच्या मदतीने भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टमचे लोकेशन शोधले होते. तरीही पाकिस्तानचे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र S-400 च्या जवळ पोहोचू शकले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रू मेंबर्सनी ही सिस्टम वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली (Mobility), ज्यामुळे शत्रू गोंधळला.
advertisement
थाड (THAAD) का अपयशी ठरले?
एअर मार्शल चोप्रा यांच्या मते, 'थाड' हे प्रामुख्याने उंचावरून येणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइल्सना रोखण्यासाठी बनवले आहे. मात्र, इराणने 'स्मार्ट' खेळी खेळत लो-अँगल क्रूझ मिसाइल्स आणि आत्मघाती ड्रोन्सचा वापर केला. थाड सोबत असलेल्या पॅट्रियट आणि आयर्न डोम सारख्या सुरक्षा यंत्रणा एकाच वेळी विविध दिशांनी होणाऱ्या या 'मल्टी-लेयर' हल्ल्यांना रोखण्यात अपयशी ठरल्या.
advertisement
>> इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचं मोठं नुकसान कसं झालं?
कतार: १.१ अब्ज डॉलर्सचे अर्ली वॉर्निंग रडार उद्ध्वस्त.
बहरीन: नौदल मुख्यालयाचे सॅटेलाइट टर्मिनल्स निकामी.
जॉर्डन/यूएई: ३०० दशलक्ष डॉलर्सचे 'थाड' रडार नष्ट.
लढाऊ विमाने: तीन F-15E स्ट्राइक ईगल विमानांचे नुकसान.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 09, 2026 10:42 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran Strike US :अमेरिकेचा THAAD ठरला फुसका बार! इराणच्या हल्ल्यात १६ हजार कोटींचा चक्काचूर, महासत्तेची कशी झाली नाचक्की!








