Malegaon : मंत्री दादा भुसे यांचा बंगला असलेल्या भागात तिघांकडून दरोड्याचा प्रयत्न, दोघांना अटक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पालकमंत्री दादा भुसे यांचा बंगला असल्यामुळे सेफ झोन मानल्या जाणाऱ्या भागात दरोडा टाकण्याची हिम्मत केली जात असेल तर मग इतर भागाचा काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
बब्बू शेख, मालेगाव, 30 डिसेंबर : मंत्री दादा भुसे यांचा बंगला असलेल्या भागातच तीन दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना मालेगावमध्ये घडलीय. दरोडेखोरांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकला. यावेळी बंगल्यातील तिघांना मारहाण केली असून ते जखमी झाले आहेत. बंगल्यातील महिलांनी आरडाओरडा केल्यानं परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. यामुळे दरोडेखोरांनी पळ काढला पण तिघांपैकी दोघांना नागरिकांनी पकडले तर एक फरार झाला.
मालेगावच्या कल्याण कट्टा भागात पालकमंत्री दादा भुसे यांचा बंगला आहे. याच भागातील एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी तिघांपैकी दोघांना पकडून चोप दिला. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या हवाली केलं. पालकमंत्री दादा भुसे यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात मालेगावात वाढत्या गुन्हेगारीवर नाराजी व्यक्त केली. आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणीही केली.
advertisement
दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांचा बंगला असल्यामुळे सेफ झोन मानल्या जाणाऱ्या भागात दरोडा टाकण्याची हिम्मत केली जात असेल तर मग इतर भागाचा काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. शेकडो नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी केली होती. पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी धुळ्याचे असून त्यांची नावे कबीर सोनवणे आणि विलास उर्फ बंटी पाटील अशी आहेत. दोघांविरुद्ध छावणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2023 6:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Malegaon : मंत्री दादा भुसे यांचा बंगला असलेल्या भागात तिघांकडून दरोड्याचा प्रयत्न, दोघांना अटक