Water Testing: नाशिकमध्ये 114 गावांतील पाणी दूषित, तुमच्या गावचं पाणी कसं? इथं तपासा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Nashik News: नाशिकमध्ये तब्बल 114 गावाचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. तुमच्या गावचं पाणी कसं? हे सिटिझन कॉर्नरवर पाहू शकता.
नाशिक: गेल्या काही काळात सुरू असणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जलस्त्रोतांचे पाणी दूषित आढळत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांत तपासणी केलेल्या 2 हजार 506 नमुन्यांपैकी 114 जलस्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य आढळले. मात्र, अशा परिस्थितीत पाण्याची तपासणी करण्यासाठी 'सिटिझन कॉर्नर' या वेबसाइटचा वापर करता येईल. या माध्यमातून आपल्या भागातील पाणी पिण्यास सुरक्षित आहे की दूषित हे पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक तपासणी जलजीवन मिशनअंतर्गत केली जाते. त्यातून पाण्याचा नमुना पिण्यास योग्य आहे की नाही, याचा अहवाल प्राप्त होतो. तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालय संकेतस्थळवरील 'सिटिझन कॉर्नर' https://ejalshakti.gov.in/jjm/citiz en_corner/villageinformation.aspx या विभागात कुणालाही पाहता येतो.
advertisement
5 टक्के पाणी आढळले दूषित
प्रत्येक जलस्त्रोताचे पाणी तपासणी अंतर्गत दर महिन्याला परिक्षण केले जाते. त्यासाठी जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात. जूनमधील अहवालानुसार 2 हजार 506 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी 114 गावांचे पाणी नमुने अर्थात सुमारे 5 टक्के पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्या पार्श्वभूमीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही सबंधितांना देण्यात आले आहेत.
advertisement
नाशिकमधील दूषित पाण्याचे नमुने
त्र्यंबकेश्वर (22), सिन्नर (20), येवला (18), बागलाण (9), निफाड (8), सुरगाणा (8), इगतपुरी (6), नांदगाव (5), मालेगाव (5), दिंडोरी (4), कळवण (3), पेठ (3), नाशिक (1), देवळा (1), चांदवड (1).
या तालुक्यांत सर्वाधिक दूषित पाणी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येते. त्यात येवला व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक दूषित नमुने आढळले असून 55 ग्रा.पं. कडून जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. या ग्रामपंचायतींनी पाणी नमुन्यात क्लोरीनचा 20 टक्के पेक्षा कमी वापर केल्याचे निर्देशना आले आहे. क्लोरिनचा कमी वापर केल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
advertisement
क्लोरीनचा वापर अपुरा
view commentsजलशुद्धीकरण करताना त्यात, क्लोरीन वापराचे प्रमाण हे 33 टक्क्यांपर्यंत असणे अपेक्षित असते. परंतु, जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुण्यांची तपासणी केल्यानंतर आरोग्य विभागानाला अहवाल प्राप्त झाला. त्यात दूषित 563 नमुन्यातील 55 नमुन्यात संबंधित ग्रामपंचायतींनी क्लोरीनचा 20 टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचे समोर आले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 30, 2025 12:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Water Testing: नाशिकमध्ये 114 गावांतील पाणी दूषित, तुमच्या गावचं पाणी कसं? इथं तपासा


