Nashik News: सराईत गुन्हेगाराचं धक्कादायक कृत्य, महिला डॉक्टरला गाठलं अन्..., नाशिकमध्ये खळबळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nashik News: ओळखीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या आर्थिक मागण्या किंवा धमक्यांना बळी न पडता नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक : नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी दवाखाना चालवणाऱ्या एका महिला डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी उकळण्यात आली. सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी आणि त्याच्या महिला साथीदाराने मिळून हा बनाव रचला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
संशयित आरोपी मानसी वाळके हिने पीडित महिला डॉक्टरशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी याला कारागृहातून जामिनावर बाहेर काढण्यासाठी तिने डॉक्टर महिलेकडे पैशांची मागणी केली होती. सुरुवातीला डॉक्टरांकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन ते गहाण ठेवले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी डॉक्टरांना इंटरनेट बँकिंगद्वारे कर्ज काढण्यास भाग पाडले. कर्जाची अडीच लाखांची रक्कम आपल्या बँक खात्यात वळवून घेतली.
advertisement
जीवे मारण्याची धमकी
ऑक्टोबर 2023 पासून हा लुटीचा प्रकार सुरू होता. दागिने आणि रोकड असा एकूण 5 लाखांचा ऐवज उकळल्यानंतर, गुन्हेगार कुंदन परदेशी याने डॉक्टर महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.
advertisement
पोलिसांची कडक पावले
कुंदन परदेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि जबरी लूट यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. परदेशी सध्या गंगापूर पोलिसांच्या ताब्यात असून, म्हसरूळ पोलीस आता या खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याचा ताबा घेणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळवंत गायकवाड पुढील तपास करत आहेत.
advertisement
दरम्यान, ओळखीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या आर्थिक मागण्या किंवा धमक्यांना बळी न पडता नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात येत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 12:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: सराईत गुन्हेगाराचं धक्कादायक कृत्य, महिला डॉक्टरला गाठलं अन्..., नाशिकमध्ये खळबळ







