Nashik News: नाशिककर पाणी जपून वापरा, संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कधी आणि का?

Last Updated:

Nashik Water Supply: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी जपून वापरावं लागेल.

Nashik News: नाशिककर पाणी जपून वापरा, संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कधी आणि का?
Nashik News: नाशिककर पाणी जपून वापरा, संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कधी आणि का?
नाशिक: नाशिककरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं लागेल. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपूर विभागातील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. मुक्त विद्यापीठ गेटजवळ 1200 मिमी व्यासाची ही पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, परिणामी रविवारी (दि. 4) शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
असे राहणार दुरुस्तीचे स्वरूप आणि वेळ
  • कामाची सुरुवात: रविवार, सकाळी 11 वाजेपासून.
  • कालावधी: दुरुस्तीसाठी किमान 8 ते 10 तास लागण्याची शक्यता.
  • प्रभावित क्षेत्र: सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी आणि सिडको या पाचही मुख्य विभागांचा पाणीपुरवठा खंडित असेल.
advertisement
सोमवारीही पाणी कपात
रविवारी दिवसभर दुरुस्ती चालणार असल्याने सोमवारी (दि. 5) सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम होईल. सोमवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
"जलवाहिनीची गळती मोठी असल्याने तातडीने काम करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी साठा जपून वापरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे." रविवारी दुपारचा आणि संध्याकाळचा पुरवठा पूर्णपणे बंद असेल, तरी नागरिकांनी आजच पाण्याचा साठा करून ठेवणे हिताचे ठरेल. असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, मनपा यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिककर पाणी जपून वापरा, संपूर्ण शहराचा पुरवठा बंद राहणार, कधी आणि का?
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement