advertisement

7 महिन्यांची गर्भवती महिला, तरी वासना जागली अन्.., अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा प्रकार

Last Updated:

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता खरातने एका गर्भवतीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

News18
News18
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्याच्यावर एका २८ वर्षीय विवाहित महिलेनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीत अनेक धक्कादायक आणि संतापजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलीस खरातची चौकशी सुरू असताना त्याचे आणखी दोन प्रकार उघडकीस आले आहेत.
एका घटस्फोटीत आणि एका गर्भवती महिलेनं आरोपी अशोक खरात विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यातील गर्भवती राहिलेल्या महिलेनं तक्रारीत अशोक खरातने अमानुष पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही गर्भवती महिला दुसरी तिसरी कुणी नव्हे तर आरोपी अशोक खरातचा निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीची पत्नी आहे. आपल्या पत्नीवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर संबंधित ओळखीच्या व्यक्तीने सापळा रचून आरोपी अशोक खरातचे सगळे कांड उघडकीस आणलं आहे.
advertisement
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा पीडितेच्या पतीनं दाखल केला आहे. पीडितेचा पती आरोपी खरातचा ओळखीचा आणि निकटवर्तीय मानला जातो. त्याने काही वर्षे खरातसोबत काम देखील केलं आहे. सन २०२३ मध्ये फिर्यादीची पत्नी (वय ३०) सात महिन्यांची गरोदर होती. संशयिताने बाळाचा जन्म सुरक्षित होण्यासह मुलगा होण्यासाठी विधी करण्याच्या बहाणा करत पीडितेला कॅबिनमध्ये बोलावलं.
advertisement
यावेळी आरोपी खरातने फिर्यादीला कॅबिनबाहेर पाठवून, लाईट बंद करून, मंत्रांच्या नावाखाली संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला. ही घटना पीडितेच्या पतीला समजल्यानंतर त्याने खरातविरुद्ध वेळोवेळी सबळ पुरावे संकलित केले. हे खरातला समजल्यावर त्याने फिर्यादीसह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, असंही फिर्यादीत म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
7 महिन्यांची गर्भवती महिला, तरी वासना जागली अन्.., अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा प्रकार
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement