Samruddhi Mahamarg: मुंबई-नाशिकचं अंतर अडीच तासावर, समृद्धीचा शेवटचा टप्पाही खुला होणार, तारीख ठरली
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 5 जूनपासून नागपूर ते मुंबई कुठलाही अडथळा न येता आता सुखाचा प्रवास करता येणार आहे.
नाशिक : मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 5 जूनपासून नागपूर ते मुंबई कुठलाही अडथळा न येता आता सुखाचा प्रवास करता येणार आहे. याचे कारण नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे उदघाटन तसेच लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जून इगतपुरी येथे पार पडणार आहे.
त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा मार्गही सुखाचा आणि लवकर पोहोचण्याचा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळं 2 तास 30 मिनिटांत मुंबईहून नाशिक पोहोचता येणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी जाहीर केली आहे.
advertisement
आता 701 किलोमीटर लांबीच्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला आहे. गुरुवारपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना न थांबता थेट मुंबईत 8 तासांत पोहोचता येणार आहे. आतापर्यंतचे महामार्गाचे टप्पे हे नागपूर ते शिर्डी असा पहिला 520 किमीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये खुला करण्यात आला होता.
advertisement
तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर, असा जवळपास 80 किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यात आला होता. गेल्या वर्षी तिसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी हा आणखी 25 किलोमीटरचा मार्ग सुरू केला गेला होता. तर आता मात्र हे सर्व टप्पे एकत्र सुरू झाल्याने प्रवास करताना वेळ वाया जाणार नसल्याचे समजत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 02, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/नाशिक/
Samruddhi Mahamarg: मुंबई-नाशिकचं अंतर अडीच तासावर, समृद्धीचा शेवटचा टप्पाही खुला होणार, तारीख ठरली