advertisement

Shirdi Sai Baba Temple: गॅस टंचाईचा शिर्डीला मोठा फटका, साईबाबांचे लाडू प्रसाद अनिश्चित काळासाठी बंद

Last Updated:

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा फटका शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा मंदिर ट्रस्टलाही बसला आहे. गॅस टंचाईमुळे साईबाबा मंदिर ट्रस्टने प्रसादाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

News18
News18
शिर्डी: आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्रामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा मंदिर ट्रस्टने प्रसादाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी करोडो भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असतात. त्यांना प्रसाद म्हणून लाडूचे पाकीट वाटप केले जाते. पण आता भाविकांना प्रसाद म्हणून लाडू मिळणार नाहीत. सध्या गॅसच्या मर्यादित साठ्यामुळे मंदिर ट्रस्टने आता प्रत्येक भाविकाला देण्यात येणारा लाडूचा प्रसाद पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका- इस्राईल विरूद्ध इराणच्या युद्धामुळे संपूर्ण देशभरामध्ये इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. विस्कळीत झालेल्या इंधन पुरवठ्यामुळे साईबाबा मंदिर ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंधन पुरवठ्याचा फटका सर्वांप्रमाणेच साईबाबा मंदिरालाही बसत आहे. गॅसच्या टंचाईमुळे मंदिर ट्रस्टने आता भाविकांना विक्रिसाठी उपलब्ध करून देण्यात येणार्‍या लाडू प्रसादाचे उत्पादन अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात गॅस बचतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रसादालयाच्या मेन्यूमध्ये काही बदल करण्यात आला आहे. गॅस टंचाईचा विचार करून संस्थान प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
अवघ्या काही दिवसांवरच रामनवमीचा उत्सव येऊन ठेपला आहे. या उत्सवानिमित्त गॅसचा साठा जपून वापरण्यासाठी संस्थानने कठोर निर्णय घेतला आहे. देशभरामध्ये निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे साईबाबांच्या प्रसादालयामध्ये भाविकांसाठी असणाऱ्या जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केला गेला आहे. भाविकांना मिळणाऱ्या जेवणातून एक भाजी कमी केली गेली आहे. उद्यापासून प्रसादालयात डिझेलवर चालणाऱ्या शेगड्या सुरू करण्यात येणार आहेत. भाविकांना दिला जाणारा बुंदी प्रसाद मात्र अद्याप सुरू आहे, पण आता लवकरच तो सुद्धा बंद केला जाणार आहे. कमी गॅस लागणाऱ्या मेन्यूला प्राधान्य दिला जात असून जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Shirdi Sai Baba Temple: गॅस टंचाईचा शिर्डीला मोठा फटका, साईबाबांचे लाडू प्रसाद अनिश्चित काळासाठी बंद
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement