advertisement

Nathuram Godse : गांधींची हत्या नथुरामने केली नाही? सावरकरांच्या दाव्यावर आव्हाड संतापले

Last Updated:

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, नथुरामच्या पिस्तुलातून गांधींची हत्या झाली नाही, असा खळबळजनक दावा सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी केला आहे.

गांधींची हत्या नथुरामने केली नाही? सावरकरांच्या दाव्यावर आव्हाड संतापले
गांधींची हत्या नथुरामने केली नाही? सावरकरांच्या दाव्यावर आव्हाड संतापले
मुंबई : महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, नथुरामच्या पिस्तुलातून गांधींची हत्या झाली नाही, असा खळबळजनक दावा सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी केला आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाचा तपास होण्याची गरज आहे, असंही रणजित सावरकर म्हणाले. रणजित सावरकरांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
'अदृश्य शक्ती असेल, काही दिवसांनी म्हणतील महात्मा गांधी तिथे नव्हतेच. भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे होता. असल्या लेखकांवर न बोललेलं बरं. अशांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार? सगळ्या देशाला माहिती आहे की गांधींचा खून गोडसेने केला,' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
'मग जगभर जाता तिथे गांधींसमोर नतमस्तक का होता? नेहरुंनी काही काम केलं नाही मग काय अदृश्य शक्तीने हे केलं का? गांधींना मारून इंग्लंडला काय फायदा होणार होता? नेहरू गांधी यांना बदनाम करण्याचा कट अनेक वर्ष सुरू आहे, आता जास्त सुरू आहे', असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले रणजित सावरकर?
76 वर्षांपूर्वी अशी घटना घडली, ज्यामुळ जगाचं राजकारण बदललं. त्याचा डाग सावरकर यांच्यावर लावला गेला. मी कपूर कमीशनचा अभ्यास सुरू केला आहे. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारलाही नाही. नथुराम गोडसे यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं नाही. नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून गांधी यांची हत्या झाली नाही. पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे. मी या सगळ्याचा अभ्यास केला आहे. 2 फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा कोन देखील वेगळा होता. फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीवर आधारित आहे, त्याचा फोटो जोडला आहे. पंचनामे खोटे बनवले आहेत. हे सगळ मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पोलिसांनी तपास नीट केला नाही. नथुराम गोडसे गांधी यांना मारायला आले होते हे 100 टक्के खरं आहे, पण त्यांनी गोळ्या मारल्या नाही हेही 100 टक्के खरं आहे. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही, असा दावा रणजित सावरकर यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nathuram Godse : गांधींची हत्या नथुरामने केली नाही? सावरकरांच्या दाव्यावर आव्हाड संतापले
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement