Ajit Pawar : 'मुख्यमंत्री साहेब, सुरेश धसांना आवर घाला', अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी भडकली!

Last Updated:

विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांवर टीकास्त्र डागलं जातं आहे.त्यात शनिवारी आमदार सुरेश धसांनी अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे…?असा सवाल करत डिवचलं होतं. सुरेश धसांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी चांगलीच भडकलीय.

ajit pawar suresh dhas
ajit pawar suresh dhas
Amol Mitkari on Suresh Dhas : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे. या अटकेनंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांवर टीकास्त्र डागलं जातं आहे.त्यात शनिवारी आमदार सुरेश धसांनी अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे…?असा सवाल करत डिवचलं होतं. सुरेश धसांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी चांगलीच भडकली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरेश धसांना आवर घालण्याची मागणी केली आहे.
कालच्या परभणीतील मोर्चातृ हातात माईक घेऊन सुरेश धस 'अजितदादा क्या हुआ तेरा वादा' असे एकेरी भाषेत बोलले होते. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारलाय.
तुमचा वाळू मोकाट सुटलाय त्याला आवर घालाल की नाही, महायुतीतील तिन्ही पक्षांनी नियम पाळले पाहिजे. प्राजक्ता माळी प्रकरणात माफी मागितल्यावर धस यांना समज दिली होती. मात्र पुन्हा त्यांनी परभणीतील मोर्चात अजितदादांवर बोलले ते राष्ट्रवादी सहन करणार नाही असा इशारा देत सुरेश धस यांना आवर घालण्याची विनंती अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केली केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे मिटकरी यांनी यावेळी सांगितले.
advertisement

सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते?

काही कारणास्तव माझ्या पक्षाकडून मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पण मी अजितदादांना म्हटलं. पाच टर्म आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंके यांना मंत्री करा, राजेश विटेकर यांना मंत्री करा आणि दोन्हीही नाही जमले तर बुलडाण्यातून निवडून आलेल्या कायंदे यांना मंत्री करा. हवे तर आमचा जिल्हा मंत्रिपदाविना ठेवा. काही फरक पतड नाही. पण या आकाच्या आकाला (धनंजय मुंडे) यांना मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, क्या हुआ तेरा वादा…. असे सुरेश धस म्हणाले.
advertisement
बीडमध्ये संदीप दिघोळेपासून संतोष देशमुखपर्यंतच्या हत्या कुणी केल्या याच्या तपासाकरिता अजित पवार तुम्ही बारामतीहून माणसं पाठवावीत. बीड आणि परभणीला जिल्ह्यात बारामतीच्या माणसांनी येऊन येथील दहशतीची चौकशी करा. हजारो लोक गावं आणि शहरं सोडून गेली आहेत, हे तुम्हाला मान्य आहे काय? असा सवाल करून धनंजय मुंडे यांची दहशत सांगत सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : 'मुख्यमंत्री साहेब, सुरेश धसांना आवर घाला', अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी भडकली!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement