मुस्लिमांना जवळ करा, राष्ट्रवादीची मुस्लीम व्होट बँकेवर नजर, दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली.
विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी, सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या हिंदुत्ववादी मतांसोबत महायुतीला मुस्लिम मतेही मिळावीत. यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून महायुतीत हिंदुत्ववादी पक्षासोबत अजित पवारांच्या माध्यमातून मुस्लिम मतांची बेगमी मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे मुस्लिमविरोधी वक्तव्ये करून राज्यभरात हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून समोर येत असताना राष्ट्रवादीकडून त्यांना केवळ समज दिली आहे, असे सांगण्यात येते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. या बैठकीत मुस्लिम समाजाला जवळ करा. त्यांना राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा ही फुले शाहू आंबेडकर यांचीच आहे, हे ठासून सांगा, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
मुस्लिमांसाठी अजित पवार हाच एकमेव नेता हे समजावून सांगा
मुस्लिम समाजा बद्दल जर कोण बोलले तर त्यांना उत्तर देणारा अजित पवार हा एकमेव नेता आहे, हे लोकांना समजावून सांगा. मुळात राष्ट्रवादी पक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालतो, हे मुस्लीम लोकांना सांगताना त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवा, अशा सूचना भरणे यांनी केल्या आहेत.
advertisement
सोलापुरात राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
सोलापुरात भाजपचे मिशन लोटसमध्ये राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॅमेज कंट्रोलसाठी शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी बैठक घेतली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 21, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुस्लिमांना जवळ करा, राष्ट्रवादीची मुस्लीम व्होट बँकेवर नजर, दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना