सन्मानाने जागा दिल्या तरच युतीत लढू नाही तर... पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची रोखठोक भूमिका

Last Updated:

Ajit Pawar NCP: शहरावरील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार
देवेंद्र फडणवीस-अजित पवार
पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर एकेकाळी राष्ट्रवादीची अर्थात अजित पवार यांची सत्ता होती, तीच सत्ता आगामी पालिका निवडणुकीमध्ये पुन्हा काबीज करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचे खुद्द शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणुका अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि पिंपरी चिंचवडचे खास नाते आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच शहरात विविध गोष्टी नावारुपाला आल्या, हे नाकारून चालणार नाही. २०१७ पर्यंत अजित पवार यांचे शहरावर एकहाती वर्चस्व होते. मात्र तत्कालिन आणि आताचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी अतिशय सूक्ष्म रणनीती आखून अजित पवार यांचे वर्चस्व ठरवून मोडित काढले. अजित पवार यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये आणून फडणवीस यांनी आव्हान उभे केले. शहरावरील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिका निवडणुकीच्या आधी जनसंवाद कार्यक्रम घेऊन आतापासून मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे नियोजन आहे.
advertisement

अजितदादांचे शहरात दौरे वाढले

महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरात दौरे वाढले आहे. कधीकाळी आपला बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवडचा गड पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. त्यासाठीच दादा पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद वाढवत आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट खोपोलीमध्ये पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत स्वबळावर लढण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट करत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची आपलीही तयारी आहे असे योगेश बहल यांनी स्पष्ट केले.
advertisement

अजित पवार यांची थेट लढाई भाजपशी असणार

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची थेट लढाई भारतीय जनत पक्षासोबत असणार आहे. राष्ट्रवादीचा जनसंवाद उपक्रम अजित पवार यांनी ठरवून भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघात घेतला. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आह. यावर तिरकस प्रतिक्रिया देत भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी दादांच्या खटाटोपामुळे त्यांच्या पक्षाला बळ मिळेल का माहीत नाही पण महापालिकेवर मात्र आमचीच सत्ता येईल असे म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सन्मानाने जागा दिल्या तरच युतीत लढू नाही तर... पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची रोखठोक भूमिका
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement