लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार? नितेश राणेंच्या त्या वक्तव्यावरुन खळबळ, नवा वाद पेटणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवर जे वक्तव्य केलं त्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
प्रसाद पाताडे, प्रतिनिधी: मुंबई : लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता येणं बाकी आहे. 15 डिसेंबरनंतर सहावा हप्ता येणार अशी चर्चा होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार अशी चर्चा होती. मात्र 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यानंतर सहावा हप्ता येईल अशी चर्चा आहे.
आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार की नाही यावरुन द्विधा मनस्थिती आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी निकष आणखी कठोर करणार, कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार असे संकेत दिले, तर अदिती तटकरे यांनी तक्रार आली तरच बघू असं म्हटलं, त्यामुळे नेमकं काय होणार याचा संभ्रम होता. आता याच दरम्यान नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवर जे वक्तव्य केलं त्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीणवरुन चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, निवडणुका आल्या की त्यांना आपला धर्म प्रिय असतो मात्र लाडकी बहीणच्या योजनाचा फायदा या लोकांनी घेतला.
या योजनेचा फायदा दोन अपत्य असणा-याना या योजनेचा फायदा देऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. नितेश राणे यांनी नाव न घेता दोन मुलं असलेल्या मुस्लीम कुटुंबांना वगळावं अशी विनंती केली आहे. या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या, मुस्लीम सोडून दोन आपत्य असणाऱ्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचणार असा निकषात बदल करा असं नितेश राणें एका भाषणादरम्यान बोलले आहेत.
advertisement
नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. सरकारी योजनांचा लाभ हे घेतात आणि निवडणुकीच्या वेळी मुस्लीम धर्म आधी राजकारण नंतर असं म्हणतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 10:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार? नितेश राणेंच्या त्या वक्तव्यावरुन खळबळ, नवा वाद पेटणार?