Dharashiv : अखेर धाराशिव नावावर शिक्कामोर्तब, कोर्टातली पाटीही बदलली
- Published by:Shreyas
Last Updated:
उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचं नाव आजपासून धारशिव करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाने अधिसूचना काढल्यानंतर कोर्टाचं नाव उस्मानाबाद ऐवजी धारशिव असं करण्यात आलं आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धारशिव, 21 डिसेंबर : उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचं नाव आजपासून धारशिव करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाने अधिसूचना काढल्यानंतर कोर्टाचं नाव उस्मानाबाद ऐवजी धारशिव असं करण्यात आलं आहे. कोर्टाच्या बोर्डावरील नाव तात्काळ बदलण्यात आलं, यानंतर जिल्हा विधिज्ञ मंडळातर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
इथून पुढे आता न्यायालयीन कामकाजातही धारशिव हेच नाव वापरलं जाणार आहे. याआधी जिल्ह्यातील सगळ्या कार्यालयांची नावं बदलण्यात आली होती, मात्र न्यायालयाचे नाव अद्यापही बदललं नव्हतं, अखेर आज हे नाव बदलण्यात आलं आहे.
advertisement
2022 सालच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धारशिव करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करून घेण्यात आला. यानंतर हा ठराव भारत सरकारच्या गृहविभागाला पाठवला गेला. गृहविभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारी 2023 साली या दोन्ही शहरांच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झालं.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
December 21, 2023 7:32 PM IST