advertisement

भाईंदरनंतर आता नागपुरात अजब प्रकार! उड्डाणपूल थेट लोकांच्या खिडकी अन् बाल्कनीतून; स्मार्ट सिटीच्या नियोजनाचा फज्जा

Last Updated:

लाल इमली चौक नागपूरमध्ये उड्डाणपूल घरांच्या बाल्कनीजवळून गेल्याने एनएचएआय आणि महापालिकेच्या नियोजनावर टीका, नागरिकांमध्ये भीती आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर: नागपूर शहरात विकासाची चक्रे जोमाने फिरत आहेत, पण हा विकास आता थेट लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात, इतकंच काय तर चक्क बेडरूमच्या खिडकीपर्यंत शिरला आहे. नागपुरातील लाल इमली चौक परिसरात एक उड्डाणपूल शेजारच्या घरांच्या इतक्या जवळून गेला आहे की, घराची बाल्कनी कोणती आणि उड्डाणपूल कोणता, हे ओळखणेही कठीण झाले आहे. या अजब प्रकारामुळे महापालिकेच्या आणि एनएचएआय'च्या नियोजनावर आता टीकेची झोड उठली आहे.
बाल्कनीतून पुलावर मारता येईल उडी!
इंदोरा ते दिघोरी या मार्गावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, लाल इमली चौक परिसरात या पुलाची रचना पाहिल्यावर कोणाचेही डोळे विस्फारतील. येथील काही घरांच्या बाल्कनी आणि खिडक्यांना हा पूल अगदी घासून गेला आहे. काही घरांची शेड तर थेट पुलाच्या कठड्याला टेकली आहेत.
अशोक चौकानंतर आता लाल इमलीची बारी
नागपुरात असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशोक चौकातही उड्डाणपूल लोकांच्या घराच्या बाल्कनीत शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळीही मोठी टीका झाली होती, पण त्यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आता लाल इमली चौकातही त्याच चुकीची पुनरावृत्ती झाली आहे. घराचे बांधकाम आधी की पुलाचे नियोजन नंतर? अशा तांत्रिक पेचात नागरिक अडकले असून, या 'डेंजरस' डिझाईनमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
advertisement
अपघाताचे 'ओपन इनव्हिटेशन'
हा उड्डाणपूल घरांच्या इतका जवळ आहे की, एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास ते थेट घरात शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच, पुलावरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज, प्रदूषण आणि सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. चोरट्यांसाठीही हा पूल घरांत शिरण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
शहराचा विस्तार आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी उड्डाणपुलांची गरज आहेच, मात्र लोकांच्या घरांवरून किंवा खिडक्यांतून पूल नेण्याचा हा 'नागपुरी पॅटर्न' नक्की कोणाच्या फायद्याचा आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाईंदरनंतर आता नागपुरात अजब प्रकार! उड्डाणपूल थेट लोकांच्या खिडकी अन् बाल्कनीतून; स्मार्ट सिटीच्या नियोजनाचा फज्जा
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement