Pankaja Munde: परळीचा राजकीय वारसदार ठरला, पंकजा मुंडेंची भरसभेत मोठी घोषणा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
परळीचा खरा राजकीय वारसा कुणाकडे द्यायचा, खरा वारसदार कोण? याची बीडच नाही तर राज्यात मोठी चर्चा सुरू होती. अखेर पंकजा मुंडेंनी भर सभेत मोठी घोषणा केली आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे परळी... परळी विधानसभा मतदार संघ हा मुंडे यांचा गड मानला जातो. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे म्हटलं की भाजप आणि भाजप म्हटलं की गोपीनाथ मुंडे हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून होते. त्यामुळेच, परळी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व गेल्या 40 ते 45 वर्षांपासून अबाधित होते. स्वत: गोपीनाथ मुंडेंनी याच मतदारसंघातून आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढली आणि जिंकली. त्यानंतर, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. गेल्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जवळपास बदलली आहेत. एकेकाळी विरोधक मानले जाणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षानंतर एकत्र आले. परळी नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात धनंजय मुंडेंना यश आले. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी आज एका कार्यक्रमात मोठी घोषणा केली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिला आहे. परळी हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र, धनंजय मुंडे एनसीपीत दाखल झाल्यापासून एनसीपीची ताकद वाढली. आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्यानंतर एकत्र निवडणुका लढवल्या. मधल्या काळात परळीचा खरा राजकीय वारसा कुणाकडे द्यायचा, खरा वारसदार कोण? याची बीडच नाही तर राज्यात मोठी चर्चा सुरू होती. यावरून राजकारण देखील तापले होते. अखेर आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम दूर झाला आहे. परळीवर प्रेम धनुभाऊला करू द्या, परळी धनु भाऊला देऊन टाकली, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी भरसभेत केले आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
परळीवर प्रेम धनुभाऊला करू द्या, परळी धनुभाऊला देऊन टाकली आहे... आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं त्यांचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील येथे त्यांनी हे वक्तव्य केले . स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली… आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात… मी परळी इतकेच माळाकोळीवर प्रेम करते. मी आता माळाकोळी सांभाळणार.. परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या… मी त्यांना परळी देऊन टाकली. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या… मी त्यांना म्हटले तुमचा मतदार संघ आहे तुम्ही प्रेम करा. मी आता माळाकोळीवर प्रेम करते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 6:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde: परळीचा राजकीय वारसदार ठरला, पंकजा मुंडेंची भरसभेत मोठी घोषणा









