फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत ही वडिलांची शिकवण, मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक, लातुरात तडाखेबंद भाषण

Last Updated:

Gopinath Munde Statue Latur: लातुरच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

पंकजा मुंडे (मंत्री, महाराष्ट्र राज्य)
पंकजा मुंडे (मंत्री, महाराष्ट्र राज्य)
शशिकांत पाटील, लातुर : माझे बाबा लोकनेते होते. लाखो लोकांच्या प्रार्थना ऐकून तरी मुंडेसाहेब पुन्हा जिवंत होतील, असे वाटले होते. माझी भाबडी आशा होती, वडिलांचा मृत्यू स्वीकारायला खूप दिवस लागले. जिवंतपणी मुंडे साहेबांनी मला वारस घोषित केले. आयुष्यात काय करायचे हे त्यांनी मला कधीच शिकवले नाही, काय करायचे नाही हे त्यांनी शिकवले, असे भावुक सुरात सांगतच 'कहाँ तुम चले गये?' म्हणत वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच संघर्ष करून त्यांनी सगळे काही मिळवले. फेकलेला तुकडा कधीच स्वीकारायचा नाही, असा कानमंत्र त्यांनी दिला. संघर्षाबरोबरच कटकारस्थानही माझ्या वाट्याला आले, असे पंकजा म्हणाल्या.
लातुरच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे,  लातुरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, नेते संभाजी पाटील निलंगेकर, विविध आमदार आणि खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस हे मुंडे साहेबांचा बेरजेच्या राजकारणाचा विचार पुढे घेऊन जातायेत

advertisement
स्वाभिमान कधीही गहाण ठेवायचा नाही. फेकलेले तुकडे कधीच स्वीकारायचे नाहीत, असे मला मुंडे साहेबांनी नेहमी सांगितले. त्यांनी मला कायम स्वाभिमान शिकवला. तसेच क्षमा करणे मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कुणी चुकलं आणि माफी मागितली तर क्षमा केली पाहिजे, अशी लाखमोलाची गोष्ट त्यांनी मला सांगितली. बेरजेचे राजकारण हे मुंडेसाहेबांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले. देवेंद्र फडणवीस हेच वैशिष्ट्ये पुढे घेऊन जात आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाले.
advertisement

माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी आहे

शिवाजी महाराजांनी युद्धही केले आणि तह देखील केला, हे बाबांनी माझ्या मनावर ठसवले. त्यामुळे कधीही कुणाविषयी देखील मनात विष बाळगायचे नाही. सगळ्यांनी वर्तन चांगले ठेवायचे.
माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी आहे. मी देखील त्यांची तत्वे आयुष्यात पाळत आली आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मुंडे-देशमुखांच्या मैत्रीचे पंकजांकडून खास वर्णन

advertisement
प्रांजळ आणि सोज्वळ राजकारणाची मैत्री म्हणजे मुंडे आणि विलासराव देशमुख यांची होती. त्यांच्या मैत्रीची चर्चा गल्ली ते दिल्ली व्हायची. पण त्यांनी पक्षाशी कायम इमान ठेवले, अशा शब्दात त्यांनी मुंडे-देशमुखांच्या मैत्रीचे वर्णन केले. तत्वांशी प्रतारणा न करण्याचा मुंडेसाहेबांचा स्वभाव होता. जो स्वाभिमानी असतो तोच संघर्ष करू शकतो. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला, असेही पंकजा मुंडे म्हणाले.
advertisement

उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही

माझ्या राजकीय प्रवासात मी एवढे शिकले की रक्ताचे नाते निवडता येतात पण विचारांचे नाते निवडता येत नाहीत. मी उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. नदी पुनर्जीवनाचे काम करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला मोठी संधी दिली आहे, असे पंकजा म्हणाल्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत ही वडिलांची शिकवण, मुंडेंच्या आठवणीत पंकजा भावुक, लातुरात तडाखेबंद भाषण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement