Pimpari Chinchwad: विधानसभा तुतारीवर मग महापालिकेला भाजपची गरज काय? राहुल कलाटे म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे अर्ज भरायला मंगळवारपासून सुरुवात झाली असताना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. निवडणुकीआधी पक्षाची साथ सोडल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. कलाटे यांनी भाजप आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यामुळे कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी विरोध करीत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटाचे नेते राहुल कलाटे यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कलाटे यांच्या प्रवेशाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कलाटेंच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला फायदा होईल, असे भाजपमधील एका गटाचे म्हणणे आहे.
विधानसभा तुतारीवर मग महापालिकेला भाजप प्रवेशाची नेमकी काय गरज होती?
राहुल कलाटे हे विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून कलाटे यांचा प्रचार केला होता. मात्र महापालिकेपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा दणका बसला आहे. विधानसभा तुतारीवर मग महापालिकेला भाजप प्रवेशाची नेमकी काय गरज होती? असे विचारले असता शहराच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कलाटे म्हणाले.
advertisement
शंकर जगताप यांच्या विरोधावर बोलताना कलाटे म्हणाले...
तसेच भाजप आमदार शंकर जगताप यांच्या तीव्र विरोधावर विचारले असता राहुल कलाटे म्हणाले, महापालिकेतील विकास ह्या एकमेव मुद्द्यासाठी आता आम्ही भाजपसोबत आलो असून समोर कोणीही असले तरी आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत. स्थानिक आमदारांच्या विरोधात लढलो असलो तरीही आमच्यात कोणताही वाद नाही तर चांगला संवाद आहे.
advertisement
ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याशी आम्ही कसे जमवून घ्यायचे?
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कलाटे यांच्या प्रवेशासंदर्भात तीव्र नाराजी आहे. आम्ही ज्यांच्याविरोधात प्रचार केला, ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याशी आम्ही कसे जमवून घ्यायचे? असा प्रश्न निष्ठावंत पदाधिकारी पक्षातील नेत्यांना विचारीत आहेत.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 3:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pimpari Chinchwad: विधानसभा तुतारीवर मग महापालिकेला भाजपची गरज काय? राहुल कलाटे म्हणाले...









