चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचा धंदा, टीपरने टोळीचा पत्ता सांगितला, पिंपरी चिंचवड पोलिसांनी अद्दल घडवली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या सूचनांनुसार तपास पथकाने ही कारवाई केली.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील चैन स्नॅचिंग आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काळेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाने जालना जिल्ह्यातील एका खेडेगावातून आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण सहा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या सूचनांनुसार तपास पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल आणि चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.
कोणकोणता मुद्देमाल जप्त करण्यात आला?
आरोपींकडून २१.५३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत ३,७९,०००/- रुपये आहे, ५ बजाज पल्सर आणि २ स्प्लेंडर अशा एकूण ७ मोटार सायकली ज्याची किंमत २,६५,०००/- रुपये आणि २ मोबाईल हॅण्डसेट आणि एक खंजर असा मुद्देमाल जप्त केला आहे.
advertisement
चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस
या आरोपींच्या अटकेमुळे काळेवाडी पोलीस स्टेशनमधील चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये २०२५ आणि २०२६ सालातील विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळे आणि सहा. पोलीस निरीक्षक वैभव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 5:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचा धंदा, टीपरने टोळीचा पत्ता सांगितला, पिंपरी चिंचवड पोलिसांनी अद्दल घडवली










