advertisement

IND vs PAK : ना पाऊस... ना उस्मान तारिक, कोलंबोमध्ये फक्त एकच गोष्ट टीम इंडियाला त्रास देणार!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरूवात होणार असून 6.30 वाजता टॉस होईल.
1/7
भारत-पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपची लढत होणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. पाकिस्तान सरकारने सुरूवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली, पण काही दिवसांनी पाकिस्तान सरकारने यू-टर्न घेतला आणि सामना खेळणार असल्याचं जाहीर केलं.

2/7
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना होणार असला तरी कोलंबोमध्ये संध्याकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे या मॅचवर नवीन संकट ओढावलं आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही टीमना 1-1 पॉईंट दिला जाईल.

3/7
भारत-पाकिस्तान यांचातला हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. इथली खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहे. पाकिस्तानच्या टीममध्ये उस्मान तारिक, अबरार अहमद, सॅम अयुब, शादाब खान आणि सलमान आगा हे स्पिन बॉलिंगचे पर्याय आहेत.

4/7
पाकिस्तानचा स्पिनर उस्मान तारिक त्याच्या बॉलिंग ऍक्शनमुळे टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एवढच नाही तर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नेट प्रॅक्टिसमध्ये उस्मान तारिकसारखी बॉलिंग करून भारतीय खेळाडूंना सराव दिला.

5/7
पाऊस आणि उस्मान तारिक टीम इंडियासाठी धोकादायक ठरतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी टीम इंडियाला खरा धोका हा प्रेमदासा स्टेडियमवरच्या बाऊंड्रीमुळे उद्भवू शकतो. या मैदानातली स्क्वेअर बाऊंड्री 75 मीटर, सरळ बाऊंड्री 84 मीटर आणि मिड विकेट-एक्स्ट्रा कव्हरची बाऊंड्री 88-89 मीटर लांब आहे.

6/7
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पहिल्या दोन मॅच मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि दिल्लीमध्ये झाल्या आहेत, जिथे बाऊंड्री फक्त 60-65 मीटर अंतरावर होत्या, त्यामुळे भारतीय खेळाडूंना कोलंबोच्या मैदानात मोठे शॉट मारताना काळजी घ्यावी लागणार आहे.

7/7
मोठ्या बाऊंड्रीमुळे फोर-सिक्सची संख्या कमी होते, आणि स्पिनरना मदत करणारी खेळपट्टी असल्यामुळे कोलंबोच्या मैदानात विजय मिळवण्यासाठी 160-170 रनचा स्कोअरही पुरेसा ठरतो, त्यामुळे भारतीय खेळाडूंना रन धावून काढण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे. जी टीम रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवेल त्या टीमच्या विजयाची शक्यता सर्वाधिक असेल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement