सगळंच फुकट कसं हवं? शेतकऱ्यांना विचारणाऱ्या दादांच्या सुपुत्रानेच २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवली

Last Updated:

शून्य टक्के व्याजदराने घेतलेले कर्ज फेडायला काय झाले? सगळेच कसे फुकट पाहिजे? असे असंवेदनशील वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी केले होते. हेच विधान आता त्यांच्या अंगलट आलंय. त्यांच्या सुपुत्राने २१ कोटींचे मुद्रांक शुल्क बुडवले आहे.

पार्थ पवार आणि अजित पवार
पार्थ पवार आणि अजित पवार
शरद जाधव, प्रतिनिधी, मुंबई  : पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन खरेदी गैरव्यवहारावरुन राज्याचे राजकारण जोरदार तापले आहे. विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरलंय. अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरलीय. तर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.
अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केल्याने आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी मोडून पडला. परंतु असे असतानाही शून्य टक्के व्याजदराने घेतलेले कर्ज फेडायला काय झाले? सगळेच कसे फुकट पाहिजे? असे असंवेदनशील वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी केले होते. हेच विधान आता त्यांच्या अंगलट आलंय. त्याच कारण ठरलंय पुण्यातील एक जमीन खरेदी घोटाळा. त्यात पार्थ पवारांचं नाव आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आलेत. त्याचं झालं असं पार्थ पवारांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. यावरुन आता विरोधकांनी अजित पवारांना त्यांच्याच विधानाची आठवण करुन दिलीय.
advertisement

21 कोटींची स्टँप ड्युटी भरणं अपेक्षित होतं पण केवळ ५०० रुपये स्टँप ड्युटी भरली

सर्वसामान्यांना घर खरेदी करताना घराच्या किमतीच्या 5 ते 7 टक्के स्टँप ड्युटी भरावी लागते. पार्थ पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात सुमारे 21 कोटींची स्टँप ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं. मात्र केवळ ५०० रुपये स्टँप ड्युटी भरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
advertisement

एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं

पुण्यातील कोरेगाव जमीन व्यवहार घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव आल्याने विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. विरोधकांनी याप्रकरणावरुन अजित पवारांना घेरण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणावरून तत्कालीन मंत्री एकनाथ खडसेंना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं.
पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारामुळे आता अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांना या प्रकरणाचे राजकीय चटके सहन करावे लागणार हे मात्र निश्चित...!
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सगळंच फुकट कसं हवं? शेतकऱ्यांना विचारणाऱ्या दादांच्या सुपुत्रानेच २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement