मुहूर्त ठरला! पुण्याला महापौर कधी मिळणार? अखेर तारीख आली समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ३०-३१ जानेवारीपर्यंत पार पडणं अपेक्षित असणारी ही निवडणूक आता लांबणीवर पडली असून, नव्या महापौरांच्या निवडीसाठी आता ६ फेब्रुवारी हा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणांमुळे हा बदल करण्यात आल्याचे समजते.
विभागीय आयुक्तांचा निर्णय
पुणे महानगरपालिकेने महापौर निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून मार्गदर्शन आणि तारखेबाबत विचारणा केली होती. या पत्रावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.
६ फेब्रुवारीला विशेष सभा
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेची पहिली विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याचवेळी महापौर आणि उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षतेसाठी कोणाची नियुक्ती केली जाते, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
राजकीय हालचालींना वेग
निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे राजकीय पक्षांना आता मोर्चेबांधणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे. इथं भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण महापौर पदासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आपल्या नावाची वर्णी लावण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. पण महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? पुण्याचा कारभारी कोण होणार? याचं चित्र आता ६ फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 12:18 PM IST








