कोल्हापुरात लव्ह स्टोरीचा करुण अंत, राधानगरीच्या जंगलात भयावह अवस्थेत आढळलं कपल

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं प्रेम प्रकरणातून एका प्रेमी युगुलाने गळफास लावून आयुष्य संपवलं आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर सालोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं प्रेम प्रकरणातून एका प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोघांनी राधानगरीच्या घनदाट जंगलात एकाच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा आणि एका तरुणाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ओंकार बरगे नावाच्या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघंही राधानगरी येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. त्यांनी आत्महत्या केली ही त्यांच्यासोबत काही घातपात घडला? याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.
राधानगरीच्या जंगलात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एकाच झाडाला दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि पंचनामा केला.
advertisement

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

या प्रेमी युगुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरच्यांचा विरोधा होता की अन्य काही वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. ओंकार बरगे आणि ती अल्पवयीन मुलगी एकाच गावातील असल्याने शेळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. राधानगरी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणती चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात लव्ह स्टोरीचा करुण अंत, राधानगरीच्या जंगलात भयावह अवस्थेत आढळलं कपल
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement