कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी विधानसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट, पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Last Updated:

Rahuri Vidhan Sabha By Poll Election: लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यात निवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. यानुसार, राहुरीसाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
मुंबई: राहुरी विधानसभा सदस्य कै. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ नुसार या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे.
ऑक्टोबर २०२४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले. वर्षभर राहुरीचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी चांगले काम केले. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ त्यांना सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यात निवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे आयोगाने संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
advertisement

एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार, दावे हरकती कधीपर्यंत घेता येणार?

यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ठेवण्यात आला आहे.
advertisement
प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी विधानसभेसाठी लवकरच पोटनिवडणूक, निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट, पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement