Hira Mavashi: रायगडची हिरकणी गेली! 80 वर्षाच्या हिरा मावशीचं निधन, शिवभक्त हळहळले!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Hira Mavashi Death: किल्ले रायगडची हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरा मावशी यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. स्वराज्याच्या राजधानीत जाणाऱ्या शिवभक्तांशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते.
रायगड: स्वराज्याची राजधानी रायगडाच्या पायथ्याशी शिवभक्तांचं आपुलकीनं स्वागत करणाऱ्या हिरा मावशीचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. किल्ले रायगडावर या मावशीन जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. रायगडाची हिरकणी म्हणून ओळखली जाणारी हिरा मावशी कायमची निघून गेल्याने शिवप्रेमी आणि पर्यटकांतून हळहळ व्यक्त होतेय.
हिरा मावशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई औकीरकर या रागयडाच्या पायथ्याशी राहात. किल्ले रायगडावर पूर्वी रोप वेची व्यवस्था नव्हती. तेव्हा शिवभक्त उन्हातान्हात रायगडावर पायीच जायचे. त्यात अगदी पर्यटक, इतिहास अभ्यासक, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार, दुर्ग अभ्यासक हे देखील असायचे. किल्ल्यावर जाताच दमून भागून आलेल्या प्रत्येकाला हिरा मावशी ‘ताक घेता का?’ असं आपुलकीनं विचारात. त्यांच्या हातचे थंडगार ताक पिऊनच शिवभक्त पुढे जात असत.
advertisement
हिरा मावशी या नेहमी बालेकिल्ला ते चित्त दरवाजा याच्या मध्यभागी ताकासोबतच कोकम सरबत, लिंबू सरबत याच्या विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करत होते. रायगडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांशी हिरा मावशीचे जिव्हाळ्याचे नाते होते. पर्यटक विश्रांतीसाठी जिथं थांबायचे त्या ठिकाणाला ‘हिराचा वाडा’ म्हणूनच ओळखलं जायचं. त्यामुळे हिरा मावशीच्या निधनाने हळहळ व्यक्त होतेय.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
July 05, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hira Mavashi: रायगडची हिरकणी गेली! 80 वर्षाच्या हिरा मावशीचं निधन, शिवभक्त हळहळले!