advertisement

Ratnagiri News: खेड गोळीबाराच्या घटनेने हादरलं, दिवसाढवळ्या कार फोडली; कोकणात काय घडलं?

Last Updated:

कोकणात दिवसाढवळ्या अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

News18
News18
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ येथील खोपी फाटा परिसरात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवले, तिच्यावर प्रथम दगडफेक करून काचा फोडल्या आणि नंतर एका तरुणाने थेट बंदूक बाहेर काढून हवेत गोळीबार केला. ही घटना भरदुपारी घडल्याने परिसरात प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकणात दिवसाढवळ्या अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीवरील दोघांनी कार समोर आडवी लावून आधी दगडफेक केली. त्यानंतर शिवीगाळ करत एका तरुणाने रिवॉल्वर काढून हवेत गोळी झाडली. हा सगळा प्रकार काही सेकंदात घडल्याने कारमधील व्यक्ती घाबरून गेले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

पोलीस  घटनास्थळी दाखल

advertisement
घटनेनंतर खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. फायरिंग केलेल्या रिवॉल्वरची पुंगळी (गोळीचा झाडलेला भाग) घटनास्थळी शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाचे चक्र फिरवण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने कोकणात गुन्हेगारीचे सावट पसरू लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri News: खेड गोळीबाराच्या घटनेने हादरलं, दिवसाढवळ्या कार फोडली; कोकणात काय घडलं?
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement