advertisement

वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश, असाही एक योगायोग

Last Updated:

आर आर पाटील यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील तर अनिल बाबर यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र सुहास बाबर हे चालवत आहेत.

अनिल बाबर-आर आर पाटील
अनिल बाबर-आर आर पाटील
असीफ मुरसळ, सांगली : वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश घडल्याचा अनोखा योगायोग घडून आलाय. १९९० साली महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री राहिलेले आर आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत प्रवेश केला होता. अगदी तसेच दोघांचे चिरंजीव रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी आज प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत प्रवेश केला. त्यामुळे एका अनोख्या योगायोग आणि १९९० सालची एकप्रकारे पुनरावृत्ती झाली असे सध्या बोलले जातेय.
तासगाव आणि खानापूर आटपाडी या शेजारी शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आर आर पाटील आणि अनिल बाबर हे दोघेही आज दुर्दैवाने हयात नाहीत. आर आर पाटील यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील तर अनिल बाबर यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र सुहास बाबर हे चालवत आहेत.
स्व. आर. आर. पाटील आबा आणि स्व. अनिलभाऊ बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर. आर. पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून त्यांनी प्रथमच विधानसभेत पाऊल ठेवले होते. आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला.
advertisement
या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आर आर पाटील आणि अनिल बाबर यांची जोडी पुन्हा एकप्रकारे एकत्र आल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवलीय. रोहित पाटील हे तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेत.
महत्त्वाचे-
दिवंगत नेते आर आर पाटील आणि दिवंगत नेते अनिल बाबर यांच्या प्रमाणे रोहित पाटील-सुहास बाबर प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत गेले होते.
advertisement
१९९० साली आर आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून विधानसभेत केला होता प्रवेश
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश, असाही एक योगायोग
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement