RRB NTPC Vacancy: रेल्वेत 8875 जागांसाठी भरती; बारावी उत्तीर्ण तरूणांना संधी, कसा अर्ज करायचा लगेच जाणून घ्या
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
RRB NTPC Recruitment Vacancy 2025: रेल्वे भरती मंडळाने RRB NTPC पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, RRB द्वारे पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण अशा एकूण 8875 पदांची भरती केली जाणार आहे.
रेल्वे भरती मंडळाने (RRB) RRB NTPC पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, RRB द्वारे पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण अशा एकूण 8875 पदांची भरती केली जाईल, ज्यामध्ये RRB NTPC पदवीधरांसाठी एकूण 5817 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. तर, RRB NTPC 12वी उत्तीर्ण असलेल्यांसाठी एकूण 3058 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. 21 ऑक्टोबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू झालेली असून नोव्हेंबर महिन्यामध्ये नोकरभरतीची शेवटची तारीख आहे. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीमधील नोकरभरती बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट http://www.rrbcdg.gov.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. एनटीपीसी कॅटेगरीतील पदांची विभागणी पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण अशा 2 प्रकारात केलेली आहे. या भरतीतील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे, तसेच या भरतीत बारावी उत्तीर्ण उमेदवार देखील सहभागी होऊ शकतात. अर्जदाराची 12वी 50 टक्के गुणांसह पूर्ण असावी. या भरतीत अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांना टायपिंग येणे आवश्यक आहे. अर्जदाराने संगणकावरील हिंदी आणि इंग्रजी टायपिंग पूर्ण केलेली हवी.
advertisement
RRB Bharti And Vacant Seats (Graduates) पद आणि त्यानुसार रिक्त जागा (पदवीधर उमेदवार):
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर - 161 रिक्त पदे
स्टेशन मास्टर - 615 रिक्त पदे
गुड्स ट्रेन मॅनेजर - 3423 रिक्त पदे
ज्युनिअर अकाउंट्सिस्टंट कम टायपिस्ट - 921 रिक्त पदे
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट -638 रिक्त पदे
वरती नमूद करण्यात आलेल्या सर्व पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज सादर करू शकतात. ज्युनिअर अकाउंट्सिस्टंट कम टायपिस्ट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट पदासाठी पदवीधर सोबत संगणकावर इंग्रजी- हिंदी टायपिंग आवश्यक आहे.
advertisement
RRB Bharti And Vacant Seats (12th Pass): पद आणि त्यानुसार रिक्त जागा (१२ वी उत्तीर्ण उमेदवार)
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)- 2424 रिक्त पदे
अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट - 394 रिक्त पदे
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट - 163 रिक्त पदे
ट्रेन्स क्लर्क - 77 रिक्त पदे
वरती नमूद करण्यात आलेल्या सर्व पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. सोबतच संगणकावर इंग्रजी- हिंदी टायपिंगही आवश्यक आहे.
advertisement
RRB Bharti, Age Limit पद आणि त्यानुसार वयोमर्यादा:
ग्रॅज्युएट लेवल पोस्ट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी 18 वर्षे ते 33 वर्षांची वयोमर्यादा आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे ठरवून देण्यात आलेल्या या ओबीसी वर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची अधिक सूट दिली जाईल. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट मिळेल. दरम्यान, 21 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठीच्या भरती प्रक्रियेची अखेरची तारीख 20 नोव्हेंबर 2025 पर्यंतची आहे. 20 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 11:59 वाजेपर्यंत ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर, 21 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठीच्या भरती प्रक्रियेची अखेरची तारीख 27 नोव्हेंबर 2025 पर्यंतची आहे. 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 11:59 वाजेपर्यंत अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
RRB Bharti, Salary (Graduates) पद आणि त्यानुसार वेतन (पदवीधर उमेदवार):
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर- 35,400/- प्रतिमहिना
स्टेशन मास्टर- 35,400/- प्रतिमहिना
गुड्स ट्रेन मॅनेजर - 29,200/- प्रतिमहिना
ज्युनिअर अकाउंट्सिस्टंट कम टायपिस्ट - 29,200/- प्रतिमहिना
सीनियर क्लर्क कम टायपिस्ट - 29,200/- प्रतिमहिना
RRB Bharti, Salary (12th Pass) पद आणि त्यानुसार रिक्त जागा (१२ वी उत्तीर्ण उमेदवार):
अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट - 21,700/- प्रतिमहिना
advertisement
तिकीट क्लर्क - 19,900/- प्रतिमहिना
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट - 19,900/- प्रतिमहिना
ट्रेन्स क्लर्क - 19,900/- प्रतिमहिना
RRB Bharti, Application Process: अर्ज प्रक्रिया:
view commentsरेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या एनटीपीसी भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. हे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार. खुल्या वर्गातील आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर अनुसूचित जाती- जमाती, माजी सैनिक, तृतीयपंथीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गट आणि महिला या वर्गातील उमेदवारांकडून 250 रुपये इतके अर्ज शुल्क आकारले जाईल. या भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Location :
Maharashtra
First Published :
October 22, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RRB NTPC Vacancy: रेल्वेत 8875 जागांसाठी भरती; बारावी उत्तीर्ण तरूणांना संधी, कसा अर्ज करायचा लगेच जाणून घ्या