advertisement

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीचा मुहूर्त ठरला, कलेक्टर साहेबांना पत्र, ग्रामविकास विभागाचे आदेश

Last Updated:

ग्रामविकास विभागाने राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या संदर्भाने पत्र देण्यात आलेले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. २० मार्च पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवड करून बैठक घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे पत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत.
पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवड अगोदर होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कोणती तारीख घोषित करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ग्रामविकास विभागाने आदेशात काय म्हटले आहे?

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या बैठका घेणे आवश्यक आहे.
advertisement
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि कलम ५९(१) मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरु होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक दिनांक २० मार्च, २०२६ पूर्वी आयोजित करावी.
advertisement

धाराशिव जिल्ह्यात सेना-भाजपमध्ये रस्सीखेच

धाराशिव जिल्ह्यात माहितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात अध्यक्षपदावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. दगा फटका होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. आता ग्रामविकास विभागाने पत्र काढल्याने राज्यातील 12 जिल्हा परिषदेसह धाराशिव जिल्हा परिषदेची ही निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीचा मुहूर्त ठरला, कलेक्टर साहेबांना पत्र, ग्रामविकास विभागाचे आदेश
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement