शरद पवार यांना धक्का, माजी गृहमंत्र्याच्या लेकाची पक्षाला सोडचिठ्ठी, निवडणुकीच्या तोंडावरच 'बॅकआऊट'
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Salil Deshmukh Resigns: एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना अचानकपणे सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याने नागपुरात चर्चा होत आहे.
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना राजीनामा पाठवून असून प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना अचानकपणे प्रकृतीचे कारण देत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत असल्याचे ते म्हणाले. आराम करण्यासाठीच आपण सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सलील देशमुख यांनी म्हटले आहे.
पक्षांतर करणार का? सलील देशमुख म्हणाले, उद्याचे सांगता येत नाही
राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन उद्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे का? असे विचारले असता, उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे पक्षांतर करणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे सलील देशमुख भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
advertisement
सलील देशमुख यांनी काटोल मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सलील देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
नेत्यांचे आभार मानले, प्रकृतीचे कारण सलील देशमुख यांचा सांगून राजीनामा
advertisement
गेल्या २०-२२ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी पक्षात मी सक्रीय आहे. नागपूर जिल्हा, शहर व विदर्भ येथे प्रामुख्याने युवकांच्या बांधणीसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये कधी यश तर कधी अपयश आले. मागील काळात मी नागपूर जिल्हा परिषद सदस्य असताना विकासावर भर देत अनेक मोठे विकास कामे व प्रकल्प सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन आपल्या परिसरासाठी आणले. यात आपण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व मंत्र्यांनी व नेत्यांनी भरपूर सहकार्य केले याचा मला अभिमान आहे. परंतु काही महिण्यापासून माझे आरोग्य योग्य नसल्यामुळे काही दिवस (६ महीने) मी कार्यरत राहू शकत नाही. करीता, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा, ही विनंती.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
November 20, 2025 5:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार यांना धक्का, माजी गृहमंत्र्याच्या लेकाची पक्षाला सोडचिठ्ठी, निवडणुकीच्या तोंडावरच 'बॅकआऊट'


