संभाजीनगरच्या तरुणाचा केदारनाथमध्ये मृत्यू, गौरीकुंडाहून पायी जाताना घडला अनर्थ

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एक तरुण केदारनाथ यात्रेसाठी उत्तराखंडला गेली होती. मात्र देवदर्शन होण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित व्यक्ती गौरीकुंडावरून पायी केदारनाथ मंदिराकडे जात होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
परमेश्वर भीमराव खवल असं मृत पावलेल्या ३८ वर्षीय भाविकाचं नाव आहे. ते संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील रहिवासी आहेत. ते काही दिवसांपूर्वी रेल्वेनं एकटेच केदारनाथ यात्रेसाठी गेले होते. पण वाटेत अनर्थ घडून देवदर्शनाआधीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर खवल हे गौरीकुंडाहून केदारनाथकडे पायी जात होते. त्यावेळी अचानक दरड कोसळली. या दरडीखाली ते सापडले. बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
परमेश्वर खवल यांचा अशाप्रकारे केदारनाथ यात्रेदरम्यान मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह महाराष्ट्रात आणला जाईल आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरच्या तरुणाचा केदारनाथमध्ये मृत्यू, गौरीकुंडाहून पायी जाताना घडला अनर्थ
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement