6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, पत्नी कॉलेजच्या बाहेर येताच भररस्त्यात पतीनं केले चाकूनं सपासप वार, सांगली हादरली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. भररस्त्यात तरुणीवर चाकूहल्ला करण्यात आला आहे.
सांगली, असिफ मुरसल, प्रतिनिधी : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सांगलीमध्ये भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर चाकूहल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे, विशेष म्हणजे हा चाकू हल्ला तिच्याच पतीनं केला आहे. घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील काॅलेज काॅर्नर येथील एका महाविद्यालया समोर एका तरुणीवर तिच्या पतीनेचे चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले. प्रांजल काळे असे या हल्ला झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर संग्राम शिंदे असं हल्लेखोराचं नाव आहे. सहा महिन्यापूर्वीच संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता.
advertisement
त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. यापूर्वीही संग्रामविरुध्द तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका काॅलेजला आली होती. त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तीच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनस्थळी घाव घेतली असून, अद्याप याबाबत पोलिसात नोंद करण्यात आलेली नाहीये.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
August 07, 2024 10:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, पत्नी कॉलेजच्या बाहेर येताच भररस्त्यात पतीनं केले चाकूनं सपासप वार, सांगली हादरली