मिरजेतून कुंभमेळ्यासाठी जाण्याची सोय, जयनगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मिरजेतून मिरज-जयनगर-मिरज नवीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुरू होणार आहे. मिरजेतून बिहारला जाणाऱ्या या रेल्वेस रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून या विशेष एक्स्प्रेसचा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात समावेश करण्यात आला आहे.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: मिरजेतून मिरज-जयनगर-मिरज नवीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस सुरू होणार आहे. मिरजेतून बिहारला जाणाऱ्या या रेल्वेस रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून या विशेष एक्स्प्रेसचा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात समावेश करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर-अहमदाबाद साप्ताहिक एक्स्प्रेसचा राजकोटपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. विशेष एक्स्प्रेस-जयनगर येथून दर मंगळवारी रात्री 11:50 वाजता सुटेल आणि मिरजेत गुरुवारी रात्री 11:45 वाजता पोहोचेल. मिरजेतून दर शुक्रवारी सकाळी 10:15 वाजता सुटेल आणि जयनगर येथे रविवारी सकाळी 9:30 वाजता पोहोचेल.
advertisement
असे आहेत थांबे
या गाडीस पुणे, मनमाड, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, दानापूर, पटना जंक्शन, समस्तीपूर व दरभंगा याठिकाणी थांबे आहेत. मिरजेतून थेट बिहारला जाणारी ही गाडी प्रवासी, उद्योजक, कामगार आणि औद्योंगिक क्षेत्रासाठी सोयीची आहे. सुमारे दोन आठवड्यात या विशेष गाडीची सुरुवात होणार असून मिरजेतून कुंभमेळ्याला जाता येणार आहे.
advertisement
कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस राजकोटपर्यंत
view commentsकोल्हापूरातून दर शनिवारी सुटणाऱ्या कोल्हापूर-अहमदाबाद गाडीचा आता राजकोटपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकात याचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी या एक्स्प्रेसचा राजकोटपर्यंत विस्तार करण्याची रेल्वेने अधिसूचना काढली होती.मात्र वर्षभर त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रवासी संघटनांनी त्याचा पाठपुरावा केला. आता नवीन वेळापत्रकात या गाडीचा विस्तार राजकोटपर्यंत केला आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
January 05, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
मिरजेतून कुंभमेळ्यासाठी जाण्याची सोय, जयनगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार


