... तर जिवंत सोडणार नाही! एक चूक अन् 9000000 रुपयांना चुना, सांगलीत काय घडलं?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: परदेशी व्यापारात भागिदारीच्या आमिष सांगलीच्या व्यापाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. त्यांची तब्बल 90 लाख 70 हजारांची फसवणूक झाली.
सांगली: परदेशातील आयात-निर्यात व्यवसायात भागीदारी करण्याच्या बहाण्याने सांगलीतील व्यापारी दिवेश जाधवजी रुपारेल (वय 45, रा. कॉलेज कॉर्नर, सांगली) यांची 90 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबईतील राजेश तुळशीदास नाखुआ (वय 45, रा. घाटकोपर) व विजय मंगे (वय 46, रा. वाशी, नवी मुंबई) या दोघांविरूद्ध मिरजेत गांधी चौक पोलिसात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.
राजेश नाखुआ यांच्या मेक इंडिया इम्पेक्स व विजय मंगे यांच्या श्री सद्गुरुकृपा शिपिंग एजन्सीमार्फत परदेशात बेदाणा, मसाले व इतर साहित्याची आयात-निर्यात केली जाते. या कंपनीचे मिरजेत कार्यालय आहे. व्यवसायात रुपारेल यांच्याशी दोघांनी भागीदारी केली होती. त्यावर विश्वास ठेवून रुपारेल यांनी कंपनीत 1 कोटी 40 लाख,70 हजार रुपये गुंतवणूक केली होती. त्यानंतर वर्षभराने परताव्याची मागणी केल्यानंतर नाखुआ यांनी 50 लाख रुपये रुपारेल यांना दिले. मात्र, उर्वरित 90 लाख 70 हजार रुपये न दिल्याची तक्रार आहे.
advertisement
पैसे मागणीचा तगादा लावल्यानंतर ‘पैसे मागितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याची रुपारेल यांनी तक्रार केली आहे. रूपारेल यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गांधी चौक पोलिसांनी दाखल केला आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Nov 21, 2025 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
... तर जिवंत सोडणार नाही! एक चूक अन् 9000000 रुपयांना चुना, सांगलीत काय घडलं?









