बेदाण्याची आवक घटली, सांगली बाजारात दरात तेजी, मिळाला तब्बल एवढा भाव
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दा द्राक्षांचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याशिवाय द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा द्राक्षे मार्केटिंग करण्याकडे कल आहे.
सांगली: बेदाण्याची आवक कमी झाल्यामुळे दरात प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. बेदाणा सौद्यामध्ये किलोला उच्चांकी 440 रुपये दर मिळाला आहे. सांगली मार्केट यार्डमध्ये बेदाणा सौद्यात 440 रुपये प्रति किलो असा उच्चांकी भाव मिळाला. यंदा द्राक्षांचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याशिवाय द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा द्राक्षे मार्केटिंग करण्याकडे कल आहे. बेदाण्याचे उत्पादन कमी होणार असल्याने दर वाढत आहेत. गेल्यावर्षी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसल्याने यंदा द्राक्षाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. बेदाण्याची द्राक्षे देखील विकली जात आहेत. याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होत आहे. मार्केटयार्डमध्ये काही दिवसांपूर्वी प्रति किलोस 371 रुपये दर मिळाला होता. त्यामध्ये वाढ झाली.
आजची बेदाणा आवक
सांगली मार्केटमध्ये आज एकूण 5672 क्विंटल आवक झाली. त्यास प्रतीनुसार 19 हजार 500 ते 44 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. 44000 हा आजपर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव ठरला.
यंदाही द्राक्ष हंगाम संकटात
सध्या शिल्लक बेदाणा कमी आणि द्राक्ष हंगामही अडचणीत असल्यामुळे बेदाण्याचे दर तेजीत राहातील, असा बेदाणा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी सांगली मार्केटमध्ये जास्तीत जास्त बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती सुजय शिंदे यांनी केले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Nov 20, 2025 8:33 PM IST









