advertisement

Sangli Walwa ZP election Result 2026 : वाळव्याचा वाघ पुरून उरला! जयंत पाटलांचा करिष्मा, 11 पैकी 7 जागांवर वाजली ना तुतारी!

Last Updated:

Walwa ZP Election Result 2026 : जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने इतर सर्व लहान-मोठ्या गटांना सोबत घेऊन एक मोठी आघाडी तयार केली आहे.

News18
News18
Walwa ZP Election Result 2026 : वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा बालेकिल्ला असूनही यंदा महायुतीने येथे मोठे आव्हान उभे केलं होतं. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने इतर सर्व लहान-मोठ्या गटांना सोबत घेऊन एक मोठी आघाडी तयार केली आहे. यामुळे चुरस निर्माण झाली होती. अशातच आता निकाल हाती येऊ लागले आहेत.
येथे प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि रयत क्रांती संघटना अशी लढत होत होती. या संघर्षात कोण बाजी मारणार, यावर सांगलीच्या सत्तेचे गणित अवलंबून होतं. अशातच आता जयंत पाटलांचा करिष्मा पुन्हा पहायला मिळाला.

येलूर जिल्हा परिषदेत भाजपाचा जलवा

वाळव्यातून एका जागेवर जयंत पाटील यांना धक्का बसला. येलूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या हर्षदा राहुल महाडीक विजयी झाल्या आहेत. त्यांनी देविका भोजराज राजेघोरपडे यांचा पराभव केलाय. पण वाळव्यात जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 07 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
advertisement

वाळव्यातील मोठ्या लढती

जिल्हा परिषद गटमहाविकास आघाडी / इतरमहायुती / इतरविजयी उमेदवार
चिकुर्डेअभिजित पाटील (शिवसेना उबाठा)Vs
अशोक पाटील (BJP)
अभिजीत पाटील
वाटेगावसंध्या आनंदराव पाटील (राष्ट्रवादी श.प.)Vs
ज्योती अमोल पाटील (BJP)
येलूरदेविका भोजराज राजेघोरपडे (राष्ट्रवादी श.प.)Vs
हर्षदा राहुल महाडिक (BJP)
हर्षदा राहुल महाडिक
कामेरीरणजित पाटील (राष्ट्रवादी श.प.)Vs
जयराज पाटील (BJP)
बोरगावजयश्री जितेंद्र पाटील (काँग्रेस)Vs
कांता शिवाजी वाटेगावकर (राष्ट्रवादी श.प.)
बागणीउर्मिला संतोष घनवट (राष्ट्रवादी श.प.)Vs
मोहिनी सागर खोत (रयत क्रांती)
मोहिनी सागर खोत
advertisement
दरम्यान, कामेरी गटात तर एकेकाळचे मित्र आता एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जयराज पाटील आणि माजी उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यातील ही लढाई पूर्णपणे व्यक्तिगत प्रतिष्ठेची बनली. वाळवा तालुक्यातील 11 गट आणि 22 गणांचा निकालावर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे राजकीय भविष्य ठरलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Walwa ZP election Result 2026 : वाळव्याचा वाघ पुरून उरला! जयंत पाटलांचा करिष्मा, 11 पैकी 7 जागांवर वाजली ना तुतारी!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement