"तू माझ्यासाठी काय मिळवलंस?" म्हणत, दारूड्या पोराने संपवलं बापाला, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य!

Last Updated:

तासगावातील कांबळेवाडीमध्ये दारूच्या व्यसनामुळे एका मुलाने आपल्या 70 वर्षीय वडिलांना मारहाण करून ठार केले. सुधाकर तुकाराम कांबळे असे मृत पित्याचे नाव असून...

Crime News
Crime News
तासगाव, सांगली : तासगावातील कांबळेवाडीमध्ये एका हृदयद्रावक घटनेने हादरवून सोडले आहे. दारूच्या नशेत पोटच्या मुलाने केलेल्या जबर मारहाणीत एका बापाचा जीव गेला आहे. सुधाकर तुकाराम कांबळे (वय-70) असे मृत पित्याचे नाव आहे. या प्रकरणी सुधाकर यांची पुतणी सुनिता कांबळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुधाकर यांचा मुलगा संतोष सुधाकर कांबळे (वय-45) याला अटक केली आहे.
दारूच्या व्यसनाने ग्रासलेले कुटुंब आणि रोजचे भांडण
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुधाकर कांबळे आणि त्यांचा मुलगा संतोष हे दोघेही मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु, दुर्दैवाने दोघांनाही दारूचे व्यसन जडले होते. याच व्यसनामुळे त्यांच्या घरात रोज वाद, भांडणं आणि मारामारी होत असे. संतोष दारू पिऊन आल्यावर दररोज वडील सुधाकर यांना मारहाण करत असे. त्यांच्या शेजारच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी अनेकदा ही भांडणे सोडवली आहेत, पण परिस्थितीत सुधारणा झाली नाही. आरोपी संतोषबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा विवाह झाला असला तरी, त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मागील सहा वर्षांपासून माहेरी राहत आहे.
advertisement
मारहाणीने बापाला केले जायबंदी
रविवारी संतोष दारू पिऊन घरी परतला. दारूच्या नशेतच त्याचा वडिलांशी वाद सुरू झाला. "तू माझ्यासाठी काय मिळवून ठेवलं आहे, तुझ्यामुळे मी भिकारी झालो", असे म्हणत त्याने सुधाकर यांना निर्दयपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. तो लाथा-बुक्क्यांनी वडिलांना मारत होता. वडील सुधाकर वयस्कर असल्यामुळे ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. मारहाणीच्या भयाने संतोषची आई घरातून बाहेर निघून गेली. दुपारी चार वाजेपर्यंत संतोष आपल्या वडिलांना मारहाण करत होता. या मारहाणीत सुधाकर यांच्या डोक्यावर, छातीवर आणि डोळ्यांवर जबर जखमा झाल्या. मारहाणीमुळे सुधाकर जमिनीवरच कोसळले आणि तिथेच पडून राहिले.
advertisement
अखेर बापाचा मृत्यू झाला
मारहाणीनंतर सुधाकर यांच्या पत्नीने त्यांना केळी खाण्यास दिली. 2 केळी खाऊनही ते तसेच जमिनीवर पडून राहिले. रात्री उशिरा जेवणासाठी उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नकार दिला आणि जमिनीवरच झोपून राहिले. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, जबर मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेने कांबळेवाडीत शोककळा पसरली असून, दारूच्या व्यसनाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
advertisement
मराठी बातम्या/सांगली/
"तू माझ्यासाठी काय मिळवलंस?" म्हणत, दारूड्या पोराने संपवलं बापाला, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement