Pune Crime : पुण्यातील 23 वर्षाच्या IT इंजिनियरने संपवलं आयुष्य, मिटिंग सोडून बाहेर पडला, अखेरची चिठ्ठी लिहिली अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune IT Engineer ends life : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष गेल्या वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होता.
Pune IT Engineer Death : पुण्यातील हिंडवडीमधून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील प्रसिद्ध आयटी सेक्टर म्हणून समोर येणाऱ्या हिंजवडीमधून आत्महत्येच्या घटना ऐकायला मिळतात. अशातच आता आणखी एक घटना हिंजवडी फेज एकमध्ये घडल्याचं पहायला मिळतंय. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. पीयूष कवडे असे मयत आयटी इंजिनिअर तरुणाचे नाव असून तो ॲटलास कॉपको कंपनी काम करत होता.
माझ्या मृत्यूला कुणालाही...
सोमवारी म्हणजे 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास पीयूषने ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्याचबरोबर त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका, असं पीयुषने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. वयाच्या 23 व्या वर्षी पीयुषने टोकाचं पाऊल उचलल्यानं सध्या खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
मिटींगमधून सोडून बाहेर पडला अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष गेल्या वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होता. त्याचा चांगला पगार देखील होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली? असा सवाल विचारला जात आहे. छातीत दुखत असल्याचे सांगून तो मिटींगमधून सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. सोमवारी सकाळी कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेत त्याने आयुष्याची अखेर केली. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
प्रेमप्रकरणातून आत्महत्या?
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. पीयुषचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली का? यावर देखील पोलीस तपास करत आहेत. कारण समोर आलं नसलं तरी वैयक्तिक कारणांतून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 29, 2025 8:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील 23 वर्षाच्या IT इंजिनियरने संपवलं आयुष्य, मिटिंग सोडून बाहेर पडला, अखेरची चिठ्ठी लिहिली अन्...