advertisement

पोटात दुखू लागलं अन् 'त्या' नराधमाचं पाप उघड झालं! संगमनेरमध्ये शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केलं गरोदर

Last Updated:

घरी येऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केला, असे सदर पिडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

News18
News18
अहिल्यानगर : शाळेत मुलगी एकटी राहत असल्याचा गैरफायदा घेत शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीची तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचं कळल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ नराधाम शिक्षकाला अटक केली असून आरोपी शिक्षक अमोल भोसले (वय 23, ता. संगमनेर) याचे विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय...
10 डिसेंबर 2024 ते 16 जानेवारी 2026 या दरम्यान शिक्षकाने पीडित मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलगी ग्रामीण भागातील एका खासगी शाळेत सध्या आठवीत शिक्षण घेत आहे. ती तिच्या घरात एकटी राहत होती. वडील माझ्यापेक्षा मोठ्या भावाचे जास्त लाड करत होते, त्यामुळे मला एकटेपणा वाटे. मी शाळेत एकटी राहत असे त्यामुळे सदर शिक्षकाने आपल्याला याबाबत कारण विचारले.  शिक्षकाने आपल्याशी मैत्री वाढवली. आईच्या मोबाईलवर आपल्याशी संपर्क केला. त्यानंतर घरी येऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केला, असे सदर पिडित मुलीने फिर्यादीत म्हणटले आहे.
advertisement

घरात घुसून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

शाळेत आणि वर्गात एकटी राहत होती. त्याचा गैरफायदा घेत शिक्षक भोसले यांनी तिच्याशी सातवीत असतानापासून मैत्री केली. पुढे तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने शाळा प्रशासनाने प्रत्येक महिन्यात शिक्षक - पालक मेळावा घ्यावा यात पोलिस सहभाग घेऊन मार्गदर्शन करतील असे यावेळी घारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी म्हटले आहे.
advertisement

पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

पंढरपूर तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानात खरेदी करायला गेल्यावर अल्पवयीन मुलानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. किराणा दुकानात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोटात दुखू लागलं अन् 'त्या' नराधमाचं पाप उघड झालं! संगमनेरमध्ये शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केलं गरोदर
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement