मनसे आणि शिवसेनेची कुठे कुठे युती ? संजय राऊतांनी यादी वाचली, आतली बातमी फोडली

Last Updated:

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप झालेले असले तरी राज्यातील इतर महापालिकांत युती-आघाडीच्या चर्चा अजूनही सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे-संजय राऊत
उद्धव ठाकरे-राज ठाकरे-संजय राऊत
मुंबई : राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा बुधवारी होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांनी दिली. ठाकरे बंधू बुधवारी एकत्र येऊन पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा करतील, असे राऊत यांनी सांगितले. तसेच जागा वाटपाचे बोलणेही अंतिम टप्प्यात आले असून आज रात्रीपर्यंत सगळ्या प्रक्रिया पार पडतील, असे राऊत यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप झालेले असले तरी राज्यातील इतर महापालिकांत युती-आघाडीच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. स्थानिक पातळीवर नेत्यांच्या जोरबैठका सुरू आहेत. शिवसेना मनसे केवळ मुंबई ठाण्यात एकत्र लढणार की इतर ठिकाणीही युती होणार, असा प्रश्न असताना संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली.
मुंबई महापालिकेसोबत ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करत आहोत, असे संजय राऊत यांनी जाहीर केले. तसेच इतरही महापालिकांत स्थानिक नेते एकमेकांशी चर्चा करीत आहेत. येत्या दोन दिवसांत स्थानिक नेते चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले.
advertisement

ठाकरे बंधू यांची उद्या दुपारी ऐतिहासिक पत्रकार परिषद

मनसे आणि शिवसेना यांच्यात उद्या अधिकृत युतीची घोषणा होईल. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्रित पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेला शरद पवार यांना निमंत्रण देण्यात येईल. ते यावेत अशी आमची अपेक्षा आहे. आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेत आम्ही युती करत आहोत. आमच्यामध्ये जागा वाटपाच्या चर्चा पूर्ण झाल्या असून अंतिम गणित आम्ही जाहीर करू, असे राऊत म्हणाले.
advertisement

तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही

जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी अजित पवार यांनी युती केली तर त्यांना महायुतीत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. पुण्यात जर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पुण्यात जाणार नाही. मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू. काँग्रेस सोबत सुद्धा आमच्या सोबत पुण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
advertisement

मुंबईत काँग्रेस सोबत येणार का?

मुंबईत काँग्रेस सोबत येणार का? या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. मात्र मुंबई वगळता इतर काही ठिकाणी काँग्रेस सोबत आली पाहिजे, यासाठी आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे राऊत म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनसे आणि शिवसेनेची कुठे कुठे युती ? संजय राऊतांनी यादी वाचली, आतली बातमी फोडली
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement