Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, संजय राऊत सार्वजनिक जीवनापासून राहणार दूर! नेमकं कारण काय?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे आपण हा निर्णय घेतला असून नवीन वर्षात सगळ्यांना भेटणार असल्याचे संजय राऊत यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
संजय राऊत हे सातत्याने शिवसेना ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडतात. माध्यमांशी संवाद साधून राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे भाष्य करतात. अनेकदा आक्रमकतेमुळे राऊतांवर सत्ताधारी बाकांवरून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मागील काही काळापासून संजय राऊत यांची प्रकृती बरी नसल्याची चर्चा सुरू होती. आता प्रकृतीच्या कारणास्तव सगळ्यांच्या भेटीगाठी घेणे, सार्वजनिक आयुष्यात उपस्थित राहणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले.  संजय राऊत हे किमान दोन महिने कोणालाही भेटणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
>> मुंबईतील मोर्चात सहभागी होणार नाही
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते उद्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. डॉक्टरांनी त्यांना उपचारांसाठी आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे संजय राऊत हे पुढील काही दिवस घरीच आराम करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
>> संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र!
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.
वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे.
advertisement
मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
कळावे.
आपला नम्र,
संजय राऊत
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
काही दिवसांपूर्वी रुग्णालयात झाले होते दाखल...
advertisement
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे रुग्णालयात प्रकृती अस्वास्थाच्या तक्रारींमुळे आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाची बाजू माध्यमांमध्ये मांडण्यासह मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. त्याशिवाय, संसदीय गटाचे प्रमुख नेते आहेत. आता संजय राऊत यांनी सार्वजनिक जीवनातून काही महिने दूर राहणार असल्याचे जाहीर केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 2:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut:  महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, संजय राऊत सार्वजनिक जीवनापासून राहणार दूर! नेमकं कारण काय?


