Sanjay Raut : काका-पुतण्याची जवळीक, मविआचे सूर बिघडले, राऊतांनी रोखठोक सांगितलं...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका-पुतण्याची राजकीय जवळीक वाढत असतानाच महाविकास आघाडीतून (मविआ) नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका-पुतण्याची राजकीय जवळीक वाढत असतानाच महाविकास आघाडीतून (मविआ) नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे म्हटले. मात्र, सुप्रिया सुळे याची चर्चा करतील असे पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता मविआमध्येच नाराजीचा सूर आवळला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भूमिका मांडली आहे.
संजय राऊत यांनी मुंबई माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊत म्हणाले, "मधल्या काळात आम्हाला वाटले होते की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाही संघर्ष आमच्यासोबत सुरू राहील. आमचा संघर्ष आजही सुरू आहे. पण, दु्र्देवाने देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही काळात शरद पवारांचा अपमान केला, याची आम्हाला खंत वाटत आहे. आम्ही तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो. हे सहकार आणि इतर विषय नंतर... आपल्यामुळे राष्ट्र आणि जग अढते यातून राजकारण्यांनी बाहेर पडावं, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
advertisement
आम्ही बाळासाहेबांचे चेले...पवारांचे राजकारण वेगळं...
संजय राऊत यांनी म्हटले की, शरद पवार यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्या, आमचे कारखाने टिकावे, कारखान्यावर आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण असल्याचे राऊत यांनी सांगितले. सोबत आलात तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्याशिवाय संघर्ष सुरू राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
advertisement
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर आता मविआमधील एकजूट किती भक्कम राहणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाल्यास मोठी राजकीय घडामोड ठरू शकते. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास खासदारांच्या संख्याबळावर अजित पवारांचे केंद्रात वजन वाढेल अशी चर्चा सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 12, 2025 1:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : काका-पुतण्याची जवळीक, मविआचे सूर बिघडले, राऊतांनी रोखठोक सांगितलं...