Santosh Deshmukh : मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जड जाणार..., देशमुख हत्या प्रकरणात जरांगेंचा CM फडणवीसांना इशारा

Last Updated:

सरकारनं सगळ्या क्षेत्राला सांगायला हवं होतं दिसला की कळवायला. ज्यांनी कळवलं नाही त्यांनाही सहआरोपी करा,तसे तातडीचे आदेश गृहमंत्रालयानं काढले पाहीजे होते. तसेच आरोपी हाती लागले तर लपून ठेवलेले याला सुद्धा सह आरोपी करून जेलमध्ये टाका.

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्यी इतकी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर चेष्ठा करणार असाल, तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जड जाणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरू, पण आम्ही आरोपींना सोडणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. त्यासोबत नुसते आरोपींना धरून चालणार नाही, त्यांना मदत करणारे जेलमध्ये गेले पाहिजेत, अशी मोठी मागणी जरांगे पाटलांनी सरकारला केली आहे.
संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जरांगे यांनी धनंजय देशमुख या्च्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगेंनी न्याय द्यायला सरकार उशीर करतंय, असा संताप व्यक्त केला. तसेच नुसते आरोपींना धरून चालणार नाही, त्यांना मदत करणारे जेलमध्ये गेले पाहिजेत.तो राष्ट्रपती जरी असला तरी तो मध्ये पाहिजे,आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आणि ते करतील अशी आशा आहे, असे जरांगे यांनी म्हटलंय.
advertisement
सरकारनं सगळ्या क्षेत्राला सांगायला हवं होतं दिसला की कळवायला. ज्यांनी कळवलं नाही त्यांनाही सहआरोपी करा,
तसे तातडीचे आदेश गृहमंत्रालयानं काढले पाहीजे होते. तसेच आरोपी हाती लागले तर लपून ठेवलेले याला सुद्धा सह आरोपी करून जेलमध्ये टाका. तसेच सरकारनं दगा फटका जरी केला तरी आम्ही संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळून देणार आहोत. आणि ग्रामपंचातीच काय पूर्ण राज्यात आंदोलन सुरु करणार असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.
advertisement
जर एखाद्याला अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ येऊ लागली.मग हे सरकार काय कामाचं. त्यामुळे सरकारनं कुणाचाही मुलाहिजा करु नये. त्याच्या पाठिशी नेता आहे त्यालाही सोडलं नाही पाहीजे. यांना दहा वीस जणांना साथ देणारा कोण? तो ही शोधायचा आहे. त्यांचे यांचे फोन झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला संतोष भैय्याचे सगळे आरोपी अटक पाहिजे, त्यांना पाठबळ देणारेही मग तो कोणत्याही पदावर असोत. पीआयला अजून का बडतर्फ केलं नाही? तुम्ही दिखावू पणाचं नाटक करू नका,अशा शब्दात जरांगेंनी सरकारला ठणकावलं. तसेच समाज आता खवळला आहे. तुम्ही जर त्यांच्या जिवाशी खेळणार असाल तर मुख्यमंत्र्यांना जड जाईल,असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जड जाणार..., देशमुख हत्या प्रकरणात जरांगेंचा CM फडणवीसांना इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement