Santosh Deshmukh Case : उद्या तेरावं आहे, संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराडसह...संतोष देशमुखांच्या भावाची सरकारकडे मोठी मागणी

Last Updated:

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली आहेत. माझ्या भावाच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी आणि एसआयटी चौकशी होत राहील, पण उद्या त्याच तेरावा आहे.

Beed Sarpanch Santosh Deshmukh case
Beed Sarpanch Santosh Deshmukh case
Beed Sarpanch Santosh Deshmukh case : सुरेश जाधव, बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत परभणी हिंसाचार आणि बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात बोलताना फडणवीस यांनी बीडमधील पोलीस एसपींची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबत मास्टरमाईंड कुणीही असो त्याला शिक्षा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका माडल्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली आहेत. माझ्या भावाच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी आणि एसआयटी चौकशी होत राहील, पण उद्या त्याच तेरावा आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सर्व आरोपींना अटक करा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. सरकारने सर्व मारेकऱ्यांना अटक करावी, हीच आमच्यासाठी खूप मोठी मदत असेल, असे धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
advertisement
धनंजय देशमुख पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे, पण लवकरात लवकर त्यांनी आरोपींना अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. तसेच बीड जिल्ह्यातील दहशत संपवावी. पुन्हा माझ्या भावासारखे कुणाचा बळी जाऊ नये म्हणून संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे देखील देशमुख यांनी सांगितले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव चर्चेत येतेय. यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, सर्वांकडून वाल्मीक कराड यांचा नाव येत आहे आणि खंडणी प्रकरणात त्यांचे फोन इतरच्या शेजारच्या सरपंचाला येत होते. त्यामुळे तपासामध्ये सर्व सत्यसमोर येईल, असे देखील धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे.
advertisement

फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. या प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असला तरी त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक पातळीवरील एसआयटी स्थापन केली जाणार असून न्यायालयीन चौकशीची ही घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : उद्या तेरावं आहे, संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराडसह...संतोष देशमुखांच्या भावाची सरकारकडे मोठी मागणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement