Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! फरार आरोपींना...पोलिस अधिक्षकांनी ग्रामस्थांना दिला शब्द

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील एक संशयित वाल्मिक कराड मंगळवारी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला होता.

santosh deshmukh murder case
santosh deshmukh murder case
Santosh Deshmukh Case Update : सुरेश जाधव, बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन आतापर्यंत 22 दिवस उलटले आहेत.मात्र अद्यापही पोलिसांना सर्व आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नाही. त्यात काही आरोपी स्वत:हून शरण आले आहेत. त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांमध्ये पोलिसांविरूद्ध रोष आहे. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी फरार आरोपींना दहा दिवसात अटक करू असा शब्द दिला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील एक संशयित वाल्मिक कराड मंगळवारी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर त्याला उशिरा रात्री सीआयडीने कोर्टात हजर केले असता त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यात अजूनही या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत. या आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं.
advertisement
ग्रामस्थांच्या या जलसमाधी आंदोलनात महिला, वयोवृद्ध आणि लहानग्यांनी सहभाग घेतला होता. या जलसमाधी आंदोलना दरम्यान एका महिलेला अचानक चक्कर आली होती. प्रभावती भिमराव सोळंके असे या चक्कर आलेल्या महिलेचे नाव होते. त्यानंतर तत्काळ त्या महिलेला नदीच्या किनाऱ्यावर आणून शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण महिलेला शुद्धच आली नसल्याने तिला पोलिसांच्या गाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
दरम्यान या घटनेनंतरही ग्रामस्थ जलसमाधी आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दहा दिवसात आरोपींना अटक करू असा ग्रामस्थांना शब्द दिला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाला स्थगिती दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! फरार आरोपींना...पोलिस अधिक्षकांनी ग्रामस्थांना दिला शब्द
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement