Santosh Deshmukh Case : ...तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा होईल, 'त्या' पोलिसांचा CDR काढा, पवारांच्या खासदाराचं फडणवीसांना चॅलेंज

Last Updated:

Bajrang Sonwane on Santosh Deshmukh Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलास समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उपोषणाचा इशारा दिला आहे.


santosh deshmukh murder case
santosh deshmukh murder case
Bajrang Sonwane on Santosh Deshmukh Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलास समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उपोषणाचा इशारा दिला आहे. तत्पुर्वी पवारांचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तुम्हाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खराच तपास करायचा ना, तर 'त्या' पोलिसांचा सीडीआर तपासा. आणि स्व: मुंडे साहेब गृहमंत्री असताना त्यांनी जे केलं होतं ते फडणवीस यांनी करून दाखवावं, असे थेट चँलेंज त्यांना दिलं आहे.
बजरंग सोनवणे बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या भावाला कुणा-कुणाचा फोन आला? पोलीस स्टेशनला बनसोड नावाच्या पीआयला कुणाचा फोन आला? बनसोडला कुणाला फोन आला? महाजन साहेबांना कुणाचा फोन आला? पाटील कुणाच्या संपर्कात होते? तुम्हाला खरा तपास करायचाय ना, तर या तिघांचा सीडीआर काढा,अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
advertisement
तसेच या प्रकरणात खंडणीचा गुन्हा आधी दाखल होतं नाही, नंतर 10 तारखेला दाखल होतो.त्यातही स्वत: एसपींना येऊन गुन्हा दाखल करावा लागतो. त्यामुळे ही कोणाची दहशत आहे? हे सुद्धा शोधणे गरजेचे आहे.तसेच या प्रकरणात 4 आरोपींना अटक झालीय, उर्वरित आरोपी कधी पकडणार? 15 दिवस झाले तरी 3 आरोपीचा का अटक झाली नाही? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तसेच या तीनही केसेस सीआयडीकडे तपासणीसाठी वर्ग कराव्यात, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
advertisement
स्व: मुंडे साहेब गृहमंत्री असताना त्यांनी जे केलं होतं ते फडणवीस यांनी करून दाखवावं आणि ही गुन्हेगारी मोडीत काढावी, असे आव्हान सोनवणे यांनी गृहमंत्र्यांना दिलं आहे. तसेच गृहमंत्री यांनी तपास आता कुठपर्यंत पोहोचला याची देखील माहिती द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी रेली आहे. तसेच येत्या 28 डिसेंबरच्या मोर्चात मी सहभागी होणार आहे.जर या प्रकरणात न्याय नाही मिळाला तर मी उपोषणालाही बसेन, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : ...तरच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा होईल, 'त्या' पोलिसांचा CDR काढा, पवारांच्या खासदाराचं फडणवीसांना चॅलेंज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement