Santosh Deshmukh : देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये, 'त्या' 77 जणांना दणका, परवानेही रद्द

Last Updated:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. गुन्हा दाखल असलेल्याकडे ही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.


Santosh deshmukh murder case
Santosh deshmukh murder case
Santosh Deshmukh News : सुरेश जाधव, बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात सीआयडी आणि पोलिस अशा वेगवेगळ्या यंत्रणा तपास करत असताना आता बीड पोलिस ॲक्शन मोडमध्ये आली आहे. बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत 74 जणांचे शस्त्र परवाना रद्द केल्याची कारवाई जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केली आहे.त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे बीडमधील जनतेने स्वागत केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. गुन्हा दाखल असलेल्याकडे ही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने पिस्टलसह फोटो, व्हिडीओ असणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले. तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता.
advertisement
त्यानंतर या प्रकरणात या सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली. यातील 71 जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे. तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरु आहे. आतापर्यंत 303 परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गरज नसताना घेण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.त्यामुळे या कारवाईचे आता बीडमध्ये स्वागत होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये, 'त्या' 77 जणांना दणका, परवानेही रद्द
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement