'31st' ची पार्टी करायला मित्रांसोबत गेला अन् थेट 400 फूट खोल दरीत आढळला, साताऱ्यात युवकासोबत घडलं भयंकर

Last Updated:

कास पठारजवळ आदित्य कांबळे ४०० फूट दरीत पडला, छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या जवानांनी मध्यरात्री थरारक बचाव करत त्याचा जीव वाचवला, उपचार सातारा रुग्णालयात सुरू.

News18
News18
सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा: सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साताऱ्यातील कास पठार परिसरातील हॉटेल्स पर्यटकांनी गजबजली होती. कुणी मित्रांसोबत तर कुणी नातेवाईकांसोबत सेलीब्रेशन करण्यात दंग होतं. त्याच वेळी एका घटनेनं साताऱ्यात खळबळ उडाली. एक युवक 400 फूट खोल दरीत आढळल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. सुदैवाने, साताऱ्यातील 'छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स'च्या जवानांनी देवदूतासारखे धावून येत त्याला दरीतून बाहेर काढलं.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रमाहुली इथे आदित्य कांबळे हा युवक ३१ डिसेंबरच्या निमित्ताने आपल्या मित्रांसोबत कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. सर्व मित्र जल्लोषात असताना, हॉटेलच्या जवळच असलेल्या दरीचा अंधारात आदित्यला अंदाज आला नाही. चालत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळला. हा सगळा प्रकार पाहून मित्रांचीही बोबडी वळली ते घाबरले.
advertisement
मध्यरात्रीचा 'रेस्क्यू ऑपरेशन'
या घटनेची माहिती मिळताच साताऱ्यातील छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. रात्रीची वेळ, कडाक्याची थंडी आणि घनदाट अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीत ट्रेकर्सनी दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. दोरखंड आणि टॉर्चच्या मदतीने ४०० फूट खाली उतरून शोध घेतला असता, आदित्य जखमी अवस्थेत सापडला. मोठी कसरत करत ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी त्याला सुरक्षितपणे दरीतून वर काढले. तब्बल ३ ते ४ तासांच्या थरारानंतर आदित्यला दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
advertisement
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
कास पठारकडे जाताना मित्रांसोबत हॉटेलमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करायचा प्लॅन ठरला यावेळी एक स्पॉट बघायला म्हणून सगळे मित्र जात असताना तोल गेला आणि युवक दरीत कोसळल्याचे त्याने सांगितलं. वेळीच मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. दरीतून बाहेर काढल्यानंतर आदित्यला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'31st' ची पार्टी करायला मित्रांसोबत गेला अन् थेट 400 फूट खोल दरीत आढळला, साताऱ्यात युवकासोबत घडलं भयंकर
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement