Mobile Internet Interesting Facts : मोबाईल किंवा इंटरनेट बंद असतो तेव्हा आलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कुठे राहतात, नंतर कसे काय येतात?

Last Updated:
Mobile Internet Intresting Facts : जेव्हा मोबाईल डेटा, वायफाय बंद असतो किंवा फोन एअरप्लेन मोडमध्ये असतो, तेव्हा तुमचा फोन इंटरनेटशी जोडलेला नसतो. म्हणजेच फोन बाहेरच्या जगाशी संवाद साधू शकत नाही. त्यामुळे त्या काळात पाठवलेले मेसेज थेट तुमच्या फोनवर पोहोचू शकत नाहीत. मग मेसेज कुठे राहतात?
1/5
मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. WhatsApp, SMS, Instagram, Facebook, Email अशा विविध माध्यमांतून आपण रोज असंख्य मेसेज पाठवतो आणि घेतो. पण कधी मोबाईल डेटा बंद असतो, कधी Wi-Fi नसतो किंवा फोन पूर्णपणे बंद असतो आणि नंतर ते सुरू झालं की त्या कालावधीत आलेले मेसेज येतात. तोपर्यंत हे मेसेज कुठे असतात, नेट सुरू करताच ते अचानक कसे येतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

advertisement
2/5
नेट बंद असताना आलेले मेसेज तुमच्या फोनमध्ये साठवले जात नाहीत, तर ते संबंधित कंपनीच्या सर्व्हरवर ठेवले जातात. उदाहरणार्थ व्हॉट्सअ‍ॅप मेसेज WhatsApp च्या क्लाउड सर्व्हरवर, इन्स्टाग्राम किवं फेसबुक मेसेज मेटा कंपनीच्या सर्व्हरवर, एसएमएस किंवा साधा मेसेज तुमच्या मोबाइल नेटवर्क कंपनीच्या सर्व्हरवर, ईमेल Gmail, Yahoo किंवा Outlook च्या मेल सर्व्हरवर जातात.  सोप्या भाषेत सांगायचं तर, तुमचं घर बंद असताना आलेली पत्रं पोस्ट ऑफिसमध्ये ठेवली जातात, अगदी तसंच.

3/5
आता हे मेसेज किती काळ सर्व्हरवर राहतात? तर प्रत्येक सेवा वेगवेगळ्या नियमांनुसार मेसेज ठेवते. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज फोन ऑफलाइन असेल तर साधारण 30 दिवसांपर्यंत मेसेज सर्व्हरवर ठेवतो. एकदा मेसेज डिलिव्हर झाला की तो सर्व्हरवरून आपोआप डिलीट होतो. एसएमएस  नेटवर्क ऑपरेटर साधारण 2 ते 7 दिवस मेसेज ठेवतात. त्या वेळेत फोन चालू न झाल्यास मेसेज डिलीट होऊ शकतो. ई-मेल अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे सर्व्हरवर सुरक्षित राहू शकतो.

4/5
आता इंटरनेट सुरू करताच मेसेज कसे येतात? जेव्हा तुम्ही मोबाईल डेटा ऑन करता किंवा वायफायला कनेक्ट होता  तेव्हा तुमचा फोन संबंधित सर्व्हरला संकेत देतो –
आता इंटरनेट सुरू करताच मेसेज कसे येतात? जेव्हा तुम्ही मोबाईल डेटा ऑन करता किंवा वायफायला कनेक्ट होता  तेव्हा तुमचा फोन संबंधित सर्व्हरला संकेत देतो – "मी आता ऑनलाईन आहे, माझे प्रलंबित मेसेज पाठवा" यावर सर्व्हर लगेचच साठवलेले सर्व मेसेज तुमच्या फोनवर पाठवतो. त्यामुळेच कधी कधी इंटरनेट सुरू करताच एकाच वेळी अनेक मेसेज येतात.
advertisement
5/5
जर बराच काळ मोबाईल किंवा इंटरनेट बंद ठेवलं तर काही मेसेज एक्सपायर होतात व्हॉट्सअ‍ॅपवर Message not delivered असा मेसेज दिसू शकतो. पाठवणाऱ्याला मेसेज पुन्हा पाठवावा लागतो.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement